अकोल्यात "जय भोले"च्या जयघोषात कावडयात्रा जल्लोषात!

By संतोष येलकर | Published: September 2, 2024 01:31 PM2024-09-02T13:31:31+5:302024-09-02T13:32:22+5:30

अकोट फैल येथून सुरु झालेल्या कावड यात्रेत " हर हर महादेव..., जय भोले..." अशा जयघोषाने श्री राजराजेश्वर नगरी दुमदुमली आहे.

Akola Kavadyatra latest updates | अकोल्यात "जय भोले"च्या जयघोषात कावडयात्रा जल्लोषात!

अकोल्यात "जय भोले"च्या जयघोषात कावडयात्रा जल्लोषात!

संतोष येलकर /अकोला : श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार,  2 सप्टेंबर रोजी सकाळी अकोला शहरात "जय भोले " चा जयघोष करीत, पालखी - कावड यात्रेला जल्लोषात सुरुवात झाली.

शहरातील अकोट फैल येथून पालखी व कावडयात्रा  सोहळयाला सुरुवात झाली असून, कावड यात्रा मार्गांवर शिवभक्त भाविकांची गर्दी उसळली आहे. गांधीग्राम येथून पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन आलेल्या कावड - पालखी मंडळानी कावड यात्रेत सहभाग घेतला आहे. अकोट फैल येथून सुरु झालेल्या कावड यात्रेत " हर हर महादेव..., जय भोले..." अशा जयघोषाने श्री राजराजेश्वर नगरी दुमदुमली आहे.

कावड यात्रा सोहळ्याच्या निमित्ताने कवड्यात्रा मार्गांवर कावड - पालखी मंडळाचे पदाधिकारी, कावडधारी आणि जिल्ह्यातील शिवभक्त भाविकांची गर्दी उसळली आहे. कावड - पालखी मार्गांवरून मार्गक्रमण करीत, शिवभक्त भाविकांकडून  अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक करण्यात येत आहे.
 
पावसातही जल्लोष अन उत्साहाचे वातावरण!
कावड - पालखी सोहळा दरम्यान सकाळी 11. 15 ते  दुपारी 12.30 वाजेपर्यंत अकोल्यात जोरदार पाऊस बरसला. बारसणाऱ्या जोरदार पावसातही कावड यात्रेत जल्लोष आणि शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसत आहे.

Web Title: Akola Kavadyatra latest updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला