अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: संजय धोत्रेंना २ लाख ६८ हजार ४६२ मतांची निर्णायक आघाडी
By atul.jaiswal | Published: May 23, 2019 05:47 PM2019-05-23T17:47:02+5:302019-05-23T17:49:17+5:30
Akola Lok Sabha Election Results 2019
- अतुल जयस्वाल
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांची घोडदौड सुरुच असून, त्यांची विजयाकडे आगेकूच सुरु आहे.
२९ व्या फेरीअखेर त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर २ लाख ६८ हजार ४६२ मतांची मोठी आघाडी घेतली आहे. संजय धोत्रे यांना ५ लाख ४१ हजार ५७४ मतं मिळाली असून , वंचित बहूजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडर यांच्या पारड्यात २ लाख ७३ हजार ११२ मतं पडली आहेत. काँग्रेसचे हिदायत पटेल यांना २ लाख ४७ हजार २१ मत मिळाली आहेत. अजुनही मतमोजणी सुरु आहे. संजय धोत्रे यांनी स्वत: चा विक्रम मोडीत काढीत पाच लाखांपेक्षा अधिक मतं मिळविली आहेत.
अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ६१ हजार ७३९ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ५९.९८ टक्के टक्के मतदान झालंय.
गेल्या निवडणुकीत संजय धोत्रे यांनी ४ लाख ५६ हजार ४७२ मतांसह विजय साकारला होता, तर काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना २ लाख ५३ हजार ३५६ मते मिळाली होती.