अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: अपक्षांपेक्षा ‘नोटा’ला अधिक मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 02:02 PM2019-05-24T14:02:51+5:302019-05-24T14:03:50+5:30
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत अपक्षांपेक्षा वरील ‘पैकी कोणीही नाही’ (नोटा)ला अधिक पसंती अकोलेकर मतदारांनी दर्शविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत अपक्षांपेक्षा वरील ‘पैकी कोणीही नाही’ (नोटा)ला अधिक पसंती अकोलेकर मतदारांनी दर्शविली आहे. अपक्ष असलेल्या उमेदवारांपैकी सर्वात जास्त म्हणजे, २५७९ मते सचिन शर्मा यांना पडली; मात्र या मतांपेक्षा अकोलेकरांनी ८८४४ मते नोटाला दिली आहेत.
निवडणूक मतदार संघात एकही उमेदवार पसंतीचा नसेल तर नोटाची सुविधा ‘ईव्हीएम’वर दिली आहे. त्याचा
पुरेपूर वापर अकोलेकरांनी केला आहे. अकोला लोकसभा मतदार संघात एकूण ११ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी पाच उमेदवार अपक्ष आणि सहा उमेदवार विविध राजकीय पक्षांचे होते. या अकराही उमेदवारांना नाकारून ८८४४ अकोलेकर मतदारांनी नोटाचे बटन दाबले आहे. अपक्ष असलेल्या पाचही उमेदवारांपैकी एकालाही आठ हजाराच्या पलिकडे मते पडली नाहीत. अपक्षांपेक्षा अकोलेकरांनी नोटाला अधिक पसंती दर्शविल्याचे चित्र या मतमोजणीतून समोर आलेल्या आकडेवारीतून दिसत आहे.
कोणाला किती मते?
अपक्ष उमेदवार मते
अरूण ठाकरे १५२८
गजानन हरणे १२७२
प्रवीण कौरपुरिया ९६३
मुरलीधर पवार २१३४
सचिन शर्मा २५७९
नोटा ८८४४