अकोला लोकसभा; उन्ह मावळताच मतदान केंद्रांवर रांगा, दुपारी ३ पर्यंत ४२.४० टक्के मतदान
By रवी दामोदर | Published: April 26, 2024 04:17 PM2024-04-26T16:17:00+5:302024-04-26T16:17:39+5:30
अकोला लोकसभा मतदारसंघातंर्गत अकोट विधानसभा मतदारसंघात ४३.४२ टक्के, बाळापूर ४५.२९, अकोला पश्चिम ३६.४६, अकोला पूर्व ४२.३०, मूर्तिजापूर ४४.९० व रिसोड विधानसभा मतदारसंघात ४२.६५ टक्के मतदान झाले आहे.
अकोला : लोकसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार राजाने गर्दी केली होती. त्यानंतर पारा वाढल्याने मतदान केंद्रांवरील गर्दी काहीशी कमी झाली होती. मात्र दुपारनंतर उन्हाचा पारा मावळताच पुन्हा गर्दी झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी दुपारी ३ पर्यंत ४२.४० टक्के मतदान झाले.
अकोला लोकसभा मतदारसंघातंर्गत अकोट विधानसभा मतदारसंघात ४३.४२ टक्के, बाळापूर ४५.२९, अकोला पश्चिम ३६.४६, अकोला पूर्व ४२.३०, मूर्तिजापूर ४४.९० व रिसोड विधानसभा मतदारसंघात ४२.६५ टक्के मतदान झाले आहे.
...आधी लगीन लोकशाहीचे!
निवडणुकीसाठी शुक्रवार, २६ एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी लोकशाहीच्या या सर्वांत मोठ्या उत्सवादरम्यान ‘आधी लगीन लोकशाहीचे’ असे सांगत जिल्ह्यातील अनेक वर-वधूंनी मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून आले.२६ एप्रिल रोजी लग्नाची तिथी दाट असल्याने शेकडो लग्नांचे नियोजन वर-वधू मंडळींनी केले होते.