Akola Lok Sabha Results 2024 : काँग्रेसचा लीड घाटात असल्याने भाजपला विजयाची आस
By नितिन गव्हाळे | Published: June 4, 2024 02:11 PM2024-06-04T14:11:21+5:302024-06-04T14:14:04+5:30
Akola Lok Sabha Results 2024 : 11 ते 15 हजारांचा लीड कायम ठेवण्यात अभय पाटील यशस्वी लीडचा टेम्पो टिकणार का?
नितीन गव्हाळे, अकोला
Akola Lok Sabha Results 2024 : अकोला लोकसभा मतदार संघामध्ये महायुती अनेक महाविकास आघाडीमध्ये काट्याची लढत होत असल्याचे तेराव्या फेरी अखेर दिसून आले आहे आतापर्यंतच्या तेराही दरम्यान महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील यांनी 11 ते पंधरा हजारांचा लीड कायम ठेवला असला तरी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना हा लीड कापून भाजप पुन्हा रेस मध्ये येईल आणि आघाडी मिळवू असा विश्वास वाटत आहे.
अकोल्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत होत आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार व राष्ट्रीय नेते एडवोकेट प्रकाश आंबेडकर जवळपास 70000 मतांनी पिछाडीवर असून तिसऱ्या क्रमांकावर आहेत तर चौथ्या क्रमांकाची मते नोटाने मिळवली आहेत. अभय पाटील यांनी 11 ते 15000 मतांचा लिड कायम ठेवला. परंतु भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अद्यापही भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे हे आघाडी मिळवतील अध्याप शहरातील उघडणे बाकी असल्याने त्या कार्यकर्त्यांना आघाडी मिळवण्याची आस वाटत आहे.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोकसभा मतदारसंघात मतांचे घुवीकरण झाले होते. तीन प्रमुख उमेदवारांमध्ये तीन मोठ्या धर्माचे मतदान विभागले गेले. त्यात भाजपला मोदी लाटेची साथ मिळाल्याने सर्व सहाही विधानसभा मतदारसंघातून भाजपला मोठी आघाडी मिळाली होती. त्यातही अकोट, अकोला पूर्व, अकोला पश्चिम आणि बाळापूर मतदारसंघांतून भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त आघाडी मिळाली होती. यावेळीही भाजपला याच विधानसभा मतदारसंघातून अपेक्षा राहणार आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत अकोला पूर्वमध्ये भाजपला लाखाच्यावर मतदान झाले होते. त्याखालोखाल अकोला पश्चिममध्ये मतदान होते. येथे भाजपचा निसटता विजय झाला होता.