एकच वादा अनुप दादा... म्हणत, भाजपच्या कार्यकर्त्यांनी उडवली काँग्रेसच्या घोषणांची खिल्ली

By नितिन गव्हाळे | Published: June 4, 2024 05:45 PM2024-06-04T17:45:26+5:302024-06-04T17:46:52+5:30

Akola Lok Sabha Results 2024 : विजयी ध्वज फडकावेत भाजपचे जोरदार सेलिब्रेशन

Akola Lok Sabha Results 2024 : BJP workers mocked the Congress slogans | एकच वादा अनुप दादा... म्हणत, भाजपच्या कार्यकर्त्यांनी उडवली काँग्रेसच्या घोषणांची खिल्ली

BJP workers mocked the Congress slogans

नितीन गव्हाळे, अकोला

Akola Lok Sabha Results 2024 : लोकसभा निवडणुकी दरम्यान हा विकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी एकच वादा अभय दादा... एकच हवा...चेहरा नवा... अभय दादा हवा... अशा घोषणा दिल्या होत्या. 35 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर काँग्रेसने अभय पाटील यांच्या रूपाने भाजपला काट्याची टक्कर दिली परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. भाजपचा उमेदवार विजय कडे वाटचाल करीत असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच वादा अनुप दादा... एकच हवा अनुप दादा हवा... अशा घोषणा देत काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना खिल्ली उडवली.

एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या मतमोजणी केंद्र परिसराच्या बाहेर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी एकच विजय जल्लोष सुरू केला असून भाजपचा भला मोठा ध्वज फडकविण्यात आला आहे. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकच वादा अनुप दादा आणि एकच हवा अनुप दादा हवा अशा घोषणा देत काँग्रेसने लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या घोषणांची चांगलीच खिल्ली उडविल्याचे यावेळी दिसून आले. आपल्यापासून विजय दूर जात असल्याचे पाहून काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र परिसरातून काढता पाय घेतला.

Web Title: Akola Lok Sabha Results 2024 : BJP workers mocked the Congress slogans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.