Akola Lok Sabha Results 2024 : भाजपचे अनुप धोत्रे यांनी मिळवली अल्पशी आघाडी

By नितिन गव्हाळे | Published: June 4, 2024 02:31 PM2024-06-04T14:31:13+5:302024-06-04T14:32:04+5:30

Akola Lok Sabha Results 2024 : भाजप कार्यकर्त्यांच्या जीवात आला जीव; काँग्रेसला अजूनही आघाडी मिळवण्याची आशा

Akola Lok Sabha Results 2024 : BJP's Anup Dhotre got a narrow lead | Akola Lok Sabha Results 2024 : भाजपचे अनुप धोत्रे यांनी मिळवली अल्पशी आघाडी

BJP's Anup Dhotre got a narrow lead

नितीन गव्हाळे, अकोला

Akola Lok Sabha Results 2024 : अकोला लोकसभा मतदार संघातील मतमोजणी ची 16 वी फेरी सुरू असून आतापर्यंतच्या सर्व फेऱ्यांमध्ये महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील यांनी लीड मिळवला होता परंतु आता पंधराव्या  फेरीमध्ये 23798 मते आणि सोळाव्या फेरीत 17242 मध्ये घेत अल्पसा का होईना, भाजपचे अनुप धोत्रे यांनी 3781 मतांची आघाडी मिळवली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या जीवात जीव आला असून त्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला आहे.

डॉक्टर अभय पाटील यांनी पंधराव्या फेरी पर्यंत 11 हजार 889 मतांचा लीड मिळवला होता परंतु पंधराव्या फेरीत सर्वाधिक 23 हजार 798 मते आणि 17 हजार 242 मते मिळवून डॉक्टर पाटील यांच्यावर अल्पसा का होईना 3781 मतांची आघाडी मिळवली आहे. भाजपचे उमेदवार धोत्रे ही आघाडी कायम ठेवण्यात यशस्वी होतात का याकडे आपला शहरातील राजकीय पक्ष व मतदारांचे लक्ष लागलेले आहे. अद्याप मतमोजणीच्या 12 फेऱ्या बाकी असून या फेऱ्यांमध्ये महाविकास आघाडी ही महायुती वरचढ ठरते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दोन फेऱ्यांमध्ये थोड्या प्रमाणात का होईना भाजपची आघाडी वाढल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून हा लीड 28 व्या फेरीपर्यंत कायम राखण्यात आम्हाला यश मिळणार असल्याचा दावा भाजपचे महानगराध्यक्ष जयंत मसने यांनी केला आहे. 

काँग्रेसचा उत्साह अद्यापही कायम
पंधराव्या फेरीपर्यंत काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील आघाडीवर असल्या मुळे महाविकास आघाडी सह काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मतमोजणी केंद्राच्या बाहेर जल्लोष साजरा करीत होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता परंतु पंधराव्या आणि सोळाव्या फेरीत भाजपच्या उमेदवाराने थोडी बहुत आघाडी मिळवल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह मावळल्याचे दिसून आले. परंतु अद्याप 12 फेऱ्या बाकी असून या फेऱ्यांमध्ये काँग्रेस पुन्हा भरारी घेईल आणि विजय प्राप्त करेल असा दावा काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखेडे पाटील यांनी केला आहे.

Web Title: Akola Lok Sabha Results 2024 : BJP's Anup Dhotre got a narrow lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.