Akola Lok Sabha Results 2024 : अकोल्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये होत आहे काट्याची टक्कर, 56 93 मतांनी काँग्रेस आघाडीवर
By नितिन गव्हाळे | Published: June 4, 2024 11:31 AM2024-06-04T11:31:04+5:302024-06-04T11:31:50+5:30
Akola Lok Sabha Results 2024 : काँग्रेस लावणार का भाजपच्या गडाला सुरुंग, वंचित पिछाडीवर असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
नितीन गव्हाळे
अकोला- भाजपचे खासदार संजय धोत्रे यांनी तब्बल वीस वर्ष अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या आजारपणामुळे त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना भाजपने रिंगणात उतरविले. मंगळवारी सकाळी आठ वाजता पासून लोकसभा मतदारसंघ मतमोजणीला प्रारंभ झाला. आतापर्यंत मतमोजणीच्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्यापासून या सहाही आठव्यांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी अल्पशा का होईना परंतु भाजपवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे 35 वर्षांपासून भाजपचा गडाला महाविकास आघाडी रुंद लावणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
अकोला लोकसभा मतदार संघातील सहाव्या फेरीच्या मतमोजणी अखेर विकास आघाडीचे अभय काशिनाथ पाटील यांनी एक लाख 3 तीनशे 64 मतांनी अल्पशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे अनुप संजय धोत्रे यांनी 97 771 मते मिळवली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी सहाव्या फेरीत 12 हजार 798 आणि ऐकून मते 72 हजार 437 मते प्राप्त केली आहेत. सहाव्या फेरीतील मतमोजणीच्या अखेरीस महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील हे 5693 मतांनी आघाडीवर असल्याचे मतमोजणी अधिकाऱ्यांनी घोषित केले आहे.
सहाव्या फेरीतील मतमोजणी अशी आहे
भाजपचे अनुभव धोत्रे 15506 मते तर एकूण मते 97 771
महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील 19 104 तर ऐकून मते एक लाख 3 हजार 364
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना सहाव्या फेरी अखेर 12 798 तर ऐकून मते 72 437 मिळाली आहेत.
महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील 93 मतांनी आघाडीवर आहेत.