Akola Lok Sabha Results 2024 : पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील 4 हजार मतांनी आघाडीवर
By नितिन गव्हाळे | Published: June 4, 2024 09:25 AM2024-06-04T09:25:50+5:302024-06-04T09:28:39+5:30
Akola Lok Sabha Results 2024 : पहिल्या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील 4203 मतांनी आघाडीवर
नितीन गव्हाळे, अकोला
Akola Lok Sabha Results 2024 : अकोला लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पहिल्या फेरीची मतमोजणी हाती आली असून या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी चार हजार 203 मतांची प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे अनुभव धोत्रे यांच्यावर आघाडी मिळवली आहे.
अकोला लोकसभा मतदार संघातील पहिल्या फेरीची मतमोजणी हाती आली असून या मतमोजणीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना 1687 मते मिळाली आहेत तर दुसऱ्या फेरीतच भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना 12 हजार 684 मते मिळाली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांना 11,122 मते मिळाली आहे. यावरून पहिल्या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील यांनी ४२०३ मतांनी आघाडी मिळवली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजाता आंबेडकर मतदान केंद्रात दाखल
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या मतमोजणी केंद्रावर सकाळी नऊ वाजताच्या सुमारास कार्यकर्त्यांसह दाखल झाले आहेत. तसेच ते वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह मतमोजणीचा आढावा घेत आहेत.