Akola Lok Sabha Results 2024 : अकोल्यात काँग्रेस व भाजपमध्ये काट्याची टक्कर

By नितिन गव्हाळे | Published: June 4, 2024 10:17 AM2024-06-04T10:17:00+5:302024-06-04T10:17:33+5:30

Akola Lok Sabha Results 2024 : काँग्रेस उमेदवार अभय पाटील आघाडीवर

Akola Lok Sabha Results 2024 : Tough fight between Congress and BJP in Akola | Akola Lok Sabha Results 2024 : अकोल्यात काँग्रेस व भाजपमध्ये काट्याची टक्कर

Tough fight between Congress and BJP in Akola

नितीन गव्हाळे अकोला
Akola Lok Sabha Results 2024 :अकोला लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणीच्या दोन फेऱ्या झाल्या असून या दोन्ही घरांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील हे भाजपचे उमेदवार अनुप संजय धोत्रे यांना काट्याची लढत देत असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर पाटील 4488 मतांसह आघाडीवर आहेत.  

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीतील मतमोजणी नुसार भाजपचे अनुप धोत्रे यांना तीस हजार आठशे दोन मते प्राप्त झाली आहेत तर महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील यांना 35000 290 मते प्राप्त झाली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अडवोकेट प्रकाश आंबेडकर यांना 22789 मते प्राप्त झाली आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी 4488 मते घेतली असून त्यांनी आघाडी मिळवल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Akola Lok Sabha Results 2024 : Tough fight between Congress and BJP in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.