अकोल्यातील व्यक्तीची मलकापूरात आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:48 PM2018-11-18T12:48:26+5:302018-11-18T12:49:10+5:30

मलकापूर : अकोला जिल्ह्यातील भौरद येथील शिवाजी बळीराम शिंदे या व्यक्तीने शहरापासून काही अंतरावर रेल्वे लाईनच्या बाजूला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली.

Akola man commit Suicides in Malkapur | अकोल्यातील व्यक्तीची मलकापूरात आत्महत्या 

अकोल्यातील व्यक्तीची मलकापूरात आत्महत्या 

Next

मलकापूर : अकोला जिल्ह्यातील भौरद येथील शिवाजी बळीराम शिंदे या व्यक्तीने शहरापासून काही अंतरावर रेल्वे लाईनच्या बाजूला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
सकाळी मलकापूर शहरातील नागरिक लक्ष्मीनगर परिसरात फिरायला जात असतात. काही व्यक्तींना एक व्यक्ती गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शहानिशा केली असता त्या व्यक्तीच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. आधारकार्डवरून त्याची ओळख पटली. आधारकार्डवर शिवाजी बळीराम शिंदे रा. भौरद, गल्ली नं. ०४. अकोला महाराष्ट्र असा पत्ता आढळून आला आहे. चिठ्ठीमध्ये ‘मी शिवाजी शिंदे, अकोला स्वत: आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्यूस कुणालीही जबाबदार धरल्या जावू नये. माझ्या प्रेताची विल्हेवाट आपल्या पद्धतीने लावावी असा मजकूर नमूद आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याबाबतची माहिती कुटूंबियांना कळवली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Akola man commit Suicides in Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.