अकोला बाजार समितीचे व्यवहार सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 16:37 IST2020-06-01T16:37:27+5:302020-06-01T16:37:50+5:30
शेतकऱ्यांना सध्या पैशांची नितांत गरज असल्याने शेतकरी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येत आहेत.

अकोला बाजार समितीचे व्यवहार सुरू!
अकोला:अकोला बाजार समितीत शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत झाले परंतु इतर दिवसापेक्षा सोमवारी शेतमाल कमी आला.सर्वात जास्त २००९ क्विंटल हरभरा तर ३४०१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.
अकोल्यात कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने पालकमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन शहरात १ ते ६ जून पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली होती. परंतु त्याला मान्यता न मिळाल्याने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू मध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या आहावनाला शहरातील प्रतिष्ठानांनी आपली दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिला दिला आहे .असे असले तरी शेतमाल खरेदी करण्यासाठी सूट देण्यात आलेली आहे. यामुळे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत पार पडले .शेतकऱ्यांना सध्या पैशांची नितांत गरज असल्याने शेतकरी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येत आहेत.परंतु सोमवारपासून अकोला शहरात जनता कर्फ्यू असल्याचे सांगण्यात येत असल्याने दररोज पेक्षा सोमवारी थोडासा शेतमाल कमी विक्रीस आला .
२००९ क्विंटल हरभरा शेतकऱ्यांनी विक्रीस आणला .हरभºयाला सरासरी प्रतिक्विंटल ३,८०० रुपये दर मिळाले. सोयाबीन ७७९ क्विंटल आवक झाली सरासरी प्रतिक्विंटल ३,५०० रुपये दर होते.४९३ क्विंटल तूर विक्रीस आली होती. तुरीला सरासरी ५,१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.३७९ क्विंटल लोकल गव्हाची आवक झाली. सरासरी दर प्रतिक्विंटल १,७०० रुपये होते.१५४ क्विंटल शरबती गहू विक्रीस आला होता .या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २,५५० रुपये दर मिळाले.
बाजार समितीच्या बोरगाव मंजू केंद्रावर ३,४०१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. या कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ५,३५० रुपये दर मिळाले.