Akola: अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला
By Atul.jaiswal | Published: June 29, 2024 06:56 PM2024-06-29T18:56:25+5:302024-06-29T18:56:54+5:30
Akola News: बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात होत असलेला बाल विवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष व ॲसीस टु जस्टीस प्रकल्प यांना यश आले.
- अतुल जयस्वाल
अकोला - बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात होत असलेला बाल विवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष व ॲसीस टु जस्टीस प्रकल्प यांना यश आले.
गावात अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची गोपनीय माहीती प्राप्त होताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, संरक्षण अधिकारी सुनिल सरकटे व ॲसीस टु जस्टीस प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे व सपना गजभिये यांनी प्रथम बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला भेट दिली. पोलीसांना सोबत घेत विवाहस्थळी सदरच्या चमुने भेट दिली असता विवाहाची पुर्ण तयारी झाल्याचे साधरणत: २०० च्या आसपास वऱ्हाडी मंडळी एकत्र जमल्या निदर्शनास आले. अशा परीस्थीती चमुने वर आणी वधुच्या आई-वडील व नातेवाईक यांना बालविवाह कायद्याची माहीती दिली. मुली चे वय १८ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय मुलींचे लग्न करता येत नाही असे सांगितले व मुलीला बाल कल्याण समिती अकोला यांचे समक्ष सादर करण्याबाबत सुचीत करण्यात आले. बालकल्याण समितीने मुली चे वय १८ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय मुलींचे लग्न न करण्याबाबतचे हमी पत्र आई-वडीलांकडून लिहून घेतले.
गावामध्ये कोठेही बालविवाह होणर असल्यास त्याची माहीती ग्रामसेवक, पोलीस पाटील, पोलीस विभाग तसेच महिला व बालविकास विभागांतर्गत असणारी जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प लाईन ॲसीस टु जस्टीस चमू यांना द्यावी. तसेच १०९८, ११२ किंवा १०० या टाेल फ्रि क्रमांकावरही माहीती देता येते.
- गिरीश पुसदकर
(जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, अकोला)