अकोला महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासून वेतन थकीत : प्रशासनास दिला आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:26 PM2017-12-16T13:26:50+5:302017-12-16T13:32:32+5:30
अकोला : गत चार महिन्यांपासून नियमित वेतन नसल्याने अकोला महापालिकेचे शेकडो सफाई कर्मचारी २६ डिसेंबरपासून आंदोलन छेडणार आहेत, याबाबतचा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
अकोला : गत चार महिन्यांपासून नियमित वेतन नसल्याने अकोला महापालिकेचे शेकडो सफाई कर्मचारी २६ डिसेंबरपासून आंदोलन छेडणार आहेत, याबाबतचा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. ७५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार फरकाची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. रजा रोखीकरणाची रक्कमही ३० ते ४० कर्मचाऱ्यांना वाटप केली आहे. मात्र, रात्रदिवस राबणाºया सफाई कर्मचाऱ्यांना वाºयावर सोडले आहे. स्वच्छ भारत स्वच्छ शहराची मोहीम राबवित असताना महापालिकेला आपल्याच सफाई कर्मचाºयांचा विसर पडला असल्याचा आरोपही पदाधिकाऱ्यांचा आहे. त्यामुळे आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सफाई कर्मचारी २६ डिसेंबरपासून उपोषण छेडणार आहे, असा इशारा अनुप खरारे, पी.बी. भातकुले, शांताराम निंधाने, बबलू सारवान, धनराज सत्याल, मदन धनजे, ईश्वर थामेत, एल.के. नकवाल यांनी दिला आहे.