मनपा सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य दिलेच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 10:51 AM2020-10-02T10:51:44+5:302020-10-02T10:51:57+5:30
Akola Municipal Corporation : महापालिकेकडून सुरक्षा किट देण्यावरून हात झटकण्यात आल्याचे दिसून आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरात साफसफाईची कामे करणाºया मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर सफाई कर्मचारी संघटनेने महापालिकेकडे सुरक्षा किट उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली होती. मागील सहा महिन्यांपासून अद्यापही सफाई कर्मचाºयांना सुरक्षा किट देण्यात आली नसून याव्यतिरिक्त मास्क, हातमोजे तसेच सॅनिटायझर आदी साहित्याचा अभाव असल्यामुळे सफाई कर्मचाºयांचा जीव धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.
शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. मनपाच्या सफाई कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर वैद्यकीय आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, जलप्रदाय विभाग व मोटरवाहन विभागातील कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सफाई कर्मचाºयांना प्रशासनाच्यावतीने कोणतीही सुरक्षा साधने दिली जात नसल्याचा आरोप करीत मनपा सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यापृष्ठभूमीवर महापौर अर्चना मसने यांच्या दालनात सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत चर्चा पार पडली असता त्यांना सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापौर मसने, माजी महापौर विजय अग्रवाल यांनी दिले होते. त्यावर सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी काम बंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. यादरम्यान, सदर साहित्य व सुरक्षा किटही उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाची असल्याचे सांगत महापालिकेकडून सुरक्षा किट देण्यावरून हात झटकण्यात आल्याचे दिसून आले आहे. ही स्थिती आजही कायम असल्याचे चित्र दिसून आहे.
प्रशासनाकडून कर्मचाºयांची बोळवण!
मनपाच्या वैद्यकीय यंत्रणेतील अधिकारी, सफाई कर्मचारी तसेच अग्निशमन विभागातील कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. एकूणच अत्यावश्यक सेवेत काम करणाºया अधिकारी-कर्मचाºयांना सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभाग तसेच स्वच्छता विभागाची असतानासुद्धा या विभागाकडून चालढकल केली जात असल्याचे दिसून येत आहे.