अकाेला महापालिकेला रुग्णवाहिकाही झेपेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 06:06 PM2020-10-30T18:06:39+5:302020-10-30T18:06:46+5:30
Akola Municipal Corporation रुग्णवाहिका चालविण्याची क्षमताही नसल्याचे मनपानेच मान्य केले आहे.
अकाेला : अकाेला पश्चिम मतदारसंघात समाविष्ट प्रभागातील विकास कामांसाठी आमदार गाेवर्धन शर्मा यांच्या निधीतून शासनाने मंजूर केलेले १५ कोटीं शिवसेनेने वळविल्यामुळे भाजपाच्या गाेटात प्रचंड अस्वस्थता आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयापर्यंत पाेहोचले आहे. विकासकामांमध्ये भाजप किती तत्पर आहे, हे दाखविण्याची एकही संधी भाजपा कधीही साेडत नाही. अशा स्थितीत आमदार शर्मा यांच्याच निधीतून मनपाला मिळालेली रुग्णवाहिका चालविण्याची क्षमताही नसल्याचे मनपानेच मान्य केले आहे. काेराेनाच्या काळात रुग्णसेवेसाठी आ. शर्मा यांच्याकडून ही रुग्णवाहिका प्राप्त हाेताच माेठा गाजावाजा करण्यात आला हाेता. आता मात्र हीच रुग्णवाहिका सर्वेापचार रुग्णालयास सुपुर्द करण्याचा प्रस्तावच महासभेपुढे ठेवण्यात आला हाेता. काही ज्येष्ठ नगरसेवकांनी हा ठराव रद्द करा, असे सांगितले; मात्र अखेरीस ताे ठराव स्थगित ठेवण्यात आला आहे; मात्र या निमित्ताने महापालिकेला एक रुग्णवाहिकाही झेपत नसल्याचे समाेर आले.