अकोला मनपातील अधिकाऱ्यांची रिक्तपदे भरणार; मुंबईत प्रधान सचिवांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:41 PM2018-03-09T13:41:19+5:302018-03-09T13:41:19+5:30
अकोला : महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी शासनाने हिरवी झेंडी दिली आहे. महापालिकेच्या कामकाजाचा गुरुवारी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी आढावा घेतला.
अकोला : महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी शासनाने हिरवी झेंडी दिली आहे. महापालिकेच्या कामकाजाचा गुरुवारी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी आढावा घेतला.
केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरात पाणी पुरवठा वितरण प्रणालीच्या कामाला सुरुवात झाली आहे. भूमिगत गटार योजनेला मंजुरी मिळाली असून, तांत्रिक सोपस्कार पूर्ण केल्यानंतर ‘भूमिगत’च्या कामाला प्रारंभ केला जाईल. आज रोजी २० कोटींतून शहरात एलईडी पथदिवे उभारल्या जात आहेत. यासह महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी गुरुवारी त्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी विकास कामांची माहिती सादर केली. रस्ता रूंदीकरणाला येणाºया अडचणींवरही बैठकीत चर्चा झाली. यावेळी मनपाचा प्रशासकीय डोलारा सांभाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांची आवश्यकता आहे. मनपातील उपायुक्तांची दोन पदे रिक्त असून, त्याव्यतिरिक्त इतरही पदे रिक्त असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांची रिक्त पदे लवकरच भरण्याचे संकेत प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिल्याची माहिती आहे.