अकोला महापालिकेचा अभियंता ३० हजार रुपयांची लाच घेताना 'एसीबी'च्या जाळयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 05:25 PM2018-12-12T17:25:50+5:302018-12-12T17:26:38+5:30
अकोला - महापालिकेतील बांधकाम विभागात कंत्राटी मानधन तत्वावर कार्यरत असलेला लाचखोर सईद अहमद शेख मुसा याला कंत्राटदाराचे देयक काढण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बुधवारी रंगेहाथ अटक करण्यात आली.
अकोला - महापालिकेतील बांधकाम विभागात कंत्राटी मानधन तत्वावर कार्यरत असलेला लाचखोर सईद अहमद शेख मुसा याला कंत्राटदाराचे देयक काढण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बुधवारी रंगेहाथ अटक करण्यात आली. कंत्राटदाराचे तीन देयक काढण्यासाठी त्याने ४० हजार रुपयांची लाच मागीतली होती.
महापालिकेतील बांधकाम विभागाचे कंत्राट घेणाऱ्या एका ४२ वर्षीय कंत्राटदाराचे थकीत असलेल्या तीन देयकांचे ८ लाख ५० हजार रुपयांचे पैसे अदा करण्यासाठी कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेला अभियंता सईद अहमद शेख मुसा याने ४० हजार रुपयांची लाच मागीतली होती. कंत्राटदार व अभियंत्यामध्ये तडजोड झाल्यानंतर ३० हजार रुपयांमध्ये देयक काढण्याचे ठरले. मात्र तक्रारकर्त्या कंत्राटदारास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोलालाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता लाच मागीतल्याचे समोर आले. एसीबीच्या मार्गदर्शनातच कंत्राटदाराने लाचेची रक्कम देण्याचे वेळ आणि ठिकाण ठरल्यानंतर लाचखोर अभियंता सईद अहमद शेख मुसा याने बुधवारी ३० हजार रुपयांची लाच स्विकारताच सापळा रचुन असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी त्याला रंगेहाथ अटक केली. लाचखोर अभियंत्याकडून ३० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अकोला लाचलुचत प्रतिबंधक खात्याचे प्रमूख संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात गजानन दामोदर, सुनील राउत, संतोष दहीहंडे, राहुल इंगळे, सुनील येलोने, सचिन धात्रक व प्रविण कश्यप यांनी केली. लाचखोर अभियंता सईद अहमद शेख मुसा याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.