अकोला मनपा करणार नाला सफाई
By admin | Published: May 25, 2016 02:11 AM2016-05-25T02:11:58+5:302016-05-25T02:11:58+5:30
कंत्राटदारांना चपराक;झोन अधिका-यांना दिले आदेश.
अकोला:मान्सूनपूर्व नाला सफाईच्या माध्यमातून खिसे भरणार्या कंत्राटदार-नगरसेवक तसेच संबंधित कर्मचार्यांच्या ह्यखाबूगिरीह्णला आळा घालण्यासाठी आयुक्त अजय लहाने यांनी यंदा एक मीटरपेक्षा मोठय़ा नाल्यांचा समावेश करताच कंत्राटदारांनी नाला सफाईच्या निविदेकडे पाठ फिरवली. तोंडावर आलेला पावसाळा आणि कंत्राटदार,कर्मचार्यांची भूमिका ध्यानात येताच आयुक्तांनी मनपाच्या स्तरावर नाला सफाई करण्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी झोन अधिकार्यांना आदेश जारी केले. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या कालावधीत शहरातील प्रमुख २00 पेक्षा अधिक नाल्यांची प्रामाणिकपणे साफसफाई केली होती. यासाठी १५ ते १७ लाख रुपये मोजण्यात आले होते. जून महिन्यापूर्वी शहरातील मोठय़ा नाल्यांची साफसफाई होणे अपेक्षित आहे. मोठय़ा नाल्यांची प्रामाणिकपणे स्वच्छता केल्यास पावसाळ्य़ात सखल भागातील रहिवाशांच्या घरात पाणी साचणार नाही, याची तसदी घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यानुषंगाने आयुक्त अजय लहाने यांनी एक मीटरपेक्षा मोठय़ा नाल्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. मात्र आयुक्तांच्या भूमिकेमुळे सर्वपक्षीय नगरसेवकांच्या अर्थकारणावर पाणी फेरल्या जाणार हे निश्चीत होते. नाला सफाईमध्ये नगरसेवक,कंत्राटदार आणि संबंधित क र्मचार्यांची अभद्र युती असल्याने प्रशासनाने प्रकाशित केलेल्या निविदा प्रक्रियेकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. शिवाय ४0 ते ५0 लक्ष रूपये खर्च केले तरच नाला सफाई शक्य असल्याचे मतही अनेक अधिकारी-कर्मचार्यांनी मांडले. हा सर्व प्रकार ध्यानात आल्यानंतर मनपाच्या स्तरावर नाला सफाई करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला.