अकोला महापालिकेने सोशल मीडिया सेल गुंडाळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:48 PM2019-04-15T12:48:16+5:302019-04-15T12:48:25+5:30

सोशल मीडिया सेल मनपाने गुंडाळला असून, प्रशासकीय माहितीपेक्षा बिनकामाच्या संदेशाची देवाण-घेवाण संबंधित कंत्राटी कर्मचाºयाला भोवल्याचे बोलल्या जात आहे.

Akola municipal wind-up Social Media Cell! | अकोला महापालिकेने सोशल मीडिया सेल गुंडाळला!

अकोला महापालिकेने सोशल मीडिया सेल गुंडाळला!

googlenewsNext

अकोला: सोशल मीडियाच्या माध्यमातून महापालिकेच्या विकास कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मनपा प्रशासनाने सोशल मीडिया सेलचे गठन केले होते. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून अकोला महापालिका, शहराचा इतिहास व सद्यस्थितीत सुरू असलेल्या विकास कामांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार होती. यासाठी नागपूर येथील प्रतिनिधीची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली होती. हा सोशल मीडिया सेल मनपाने गुंडाळला असून, प्रशासकीय माहितीपेक्षा बिनकामाच्या संदेशाची देवाण-घेवाण संबंधित कंत्राटी कर्मचाºयाला भोवल्याचे बोलल्या जात आहे.
आजच्या घडीला माहितीचे सर्वाधिक वेगवान माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पाहिल्या जाते. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक व टिष्ट्वटरच्या माध्यमातून जगाच्या कोणत्याही कोपºयातील माहितीचे आदान-प्रदान तातडीने होऊ शकते. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक आदी महापालिका त्यांची इत्थंभूत माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना उपलब्ध करून देत आहेत. त्याच धर्तीवर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांनी अकोला मनपाचा पूर्वइतिहास, शहराची माहिती, मनपातील विविध विभागांची माहिती, तक्रार निवारण करणाºया टोल फ्री क्रमांकाची माहिती तसेच शासनाद्वारे सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी सोशल मीडिया सेल कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला होता. दैनंदिन ताज्या घडोमोडींमुळे प्रशासनाला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे, साफसफाई राखण्यासाठी सूचना व समस्या निकाली काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे, असा यामागचा उद्देश होता. यासंदर्भात सत्ताधारी भाजपला संपूर्ण माहिती दिल्यानंतरच सोशल मीडिया सेल कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मीडिया सेलची जबाबदारी नागपूर येथील संस्थेला देण्यात येऊन कंत्राटी तत्त्वावर प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आली होती. नंतर कोठे माशी शिंकली देव जाणे, अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीतच हा सेल गुंडाळण्यात आला.

महापौरांच्या हस्ते उद्घाटन
सप्टेंबर २०१८ मध्ये मनपा प्रशासनाने कार्यान्वित केलेल्या सोशल मीडिया सेलचे महापौर विजय अग्रवाल यांच्या हस्ते मनपाच्या मुख्य सभागृहात रीतसर उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी सत्तापक्षातील पदाधिकारी व मनपा अधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: Akola municipal wind-up Social Media Cell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.