कोणीही या अन् वाहने उभी करा; मनपाच्या कार्यालय परिसरात वाहनांची गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:38 PM2020-01-13T12:38:35+5:302020-01-13T12:38:43+5:30

नागरिक बिनदिक्कतपणे त्यांची चारचाकी किंवा दुचाकी वाहने मनपा कार्यालय परिसरात उभी करून निघून जात असल्याचे चित्र आहे.

  In Akola Municipality Anyone can park vehicles | कोणीही या अन् वाहने उभी करा; मनपाच्या कार्यालय परिसरात वाहनांची गर्दी 

कोणीही या अन् वाहने उभी करा; मनपाच्या कार्यालय परिसरात वाहनांची गर्दी 

Next

अकोला: शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या महापालिकेच्या कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांच्या वाहनांशिवाय बाजारपेठेत खरेदीसाठी येणाºया अकोलेकरांच्या वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे मनपात धड चालण्यासाठीदेखील जागा नसल्यामुळे या प्रकाराचा मनपा अधिकाºयांसह कर्मचाºयांना वैताग आला आहे. हा प्रकार पाहता मुख्य प्रवेशद्वारावर नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षकांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहराची प्रमुख बाजारपेठ गांधी रोड परिसरात एकवटली आहे. या ठिकाणी मनपाचे प्रशस्त कार्यालय असल्यामुळे बाजारपेठेत विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक बिनदिक्कतपणे त्यांची चारचाकी किंवा दुचाकी वाहने मनपा कार्यालय परिसरात उभी करून निघून जात असल्याचे चित्र आहे. आज रोजी मनपामध्ये १ हजार ८०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी बहुतांश कर्मचाºयांची नियुक्ती झोननिहाय करण्यात आल्यामुळे मनपाच्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये गर्दी आढळून येत नाही. अशा स्थितीत मनपाच्या आवारात तीनशे-चारशे नव्हे, तर तब्बल अडीच ते तीन हजार वाहनांची दररोज पार्किंग केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. वाहनांची वाढती संख्या पाहून त्याला तातडीने आळा घालण्याचे सोडून महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी मनपा आवारात अधिकाºयांच्या वाहनांसाठी दोºया बांधून आखणी करीत उर्वरित जागा मोकळी सोडल्याचे चित्र आहे. याचा नेमका उलटा परिणाम झाला असून, उर्वरित खुल्या जागेमध्ये वाहनांची मोठी संख्या पाहावयास मिळत आहे. यामुळे मनपा आवारात धड पायी चालण्यासाठीही जागा शिल्लक नसल्यामुळे या विचित्र प्रकाराकडे लक्ष देऊन प्रशासनाने त्यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

नगरसेवकांनो, कार्यकर्त्यांना सांभाळा!
मनपातील सत्ताधारी असो वा विरोधी पक्षातील पदाधिकाºयांकडे विविध समस्या घेऊन नागरिक येतात. नगरसेवकांच्या दिमतीलादेखील चार-पाच कार्यकर्ते असतात. त्यांना सुरक्षा रक्षकांकडून शिस्तीत वाहने ठेवण्याची सूचना केल्यानंतर त्यांच्याकडून अरेरावीची भाषा केली जाते. यामुळे नाईलाजाने सुरक्षा रक्षक चुप्पी साधणे पसंत करतात. अशा कार्यकर्त्यांना पदाधिकारी व नगरसेवकांनी सूचना करण्याची गरज आहे.

व्यावसायिकांची मनमानी; मनपाने निर्णय घ्यावा!
महापालिका कार्यालयासमोर कवच आर्केड व इतर व्यावसायिक संकुल आहेत. त्या संकुलांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून व्यवसाय थाटणाऱ्या व्यावसायिकांना त्यांची वाहने ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही. संबंधितांच्या संकुलमध्ये पार्किंगसाठी आरक्षित जागेवर दुकाने बांधण्यात आल्यामुळे सदर व्यावसायिक व त्यांच्या प्रतिष्ठानमध्ये काम करणारे असंख्य कर्मचारी यांनी वाहनतळ म्हणून मनपाच्या परिसराचा वापर सुरू केला आहे. या प्रकाराकडे लक्ष देऊन मनपाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

 

Web Title:   In Akola Municipality Anyone can park vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.