अकोला : राष्ट्रीय ड्यूबॉल स्पर्धेत गोवा संघाने कायम राखले अजिंक्य पद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 09:23 PM2018-01-30T21:23:22+5:302018-01-30T23:25:27+5:30
अकोला: मुलांच्या गटात दिल्ली व गोवा संघात अंतिम टक्कर झाली. गोवाने आपला आक्रमक खेळ करीत ४-१२ असा दणदणीत विजय मिळविला, तर मुलींच्या गटातही दिल्ली आणि गोवा संघातच अंतिम सामना खेळला गेला. हा सामनादेखील गोवा संघाने ५-३ ने जिंकून जेतेपद पटकाविले. गतविजेता गोवा संघाने आपल्या नावाला साजेशी खेळी करीत चौथ्या राष्ट्रीय ज्युनिअर ड्यूबॉल स्पर्धेचे अजिंक्य पद कायम राखले.
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: मुलांच्या गटात दिल्ली व गोवा संघात अंतिम टक्कर झाली. गोवाने आपला आक्रमक खेळ करीत ४-१२ असा दणदणीत विजय मिळविला, तर मुलींच्या गटातही दिल्ली आणि गोवा संघातच अंतिम सामना खेळला गेला. हा सामनादेखील गोवा संघाने ५-३ ने जिंकून जेतेपद पटकाविले. गतविजेता गोवा संघाने आपल्या नावाला साजेशी खेळी करीत चौथ्या राष्ट्रीय ज्युनिअर ड्यूबॉल स्पर्धेचे अजिंक्य पद कायम राखले.
संगीतकार वसंत देसाई स्टेडिअम येथे मंगळवारी स्पर्धेचा समारोप झाला. मुलींच्या गटात गोवा व दिल्ली संघात रोमहर्षक सामना झाला. गोव्याच्या मुस्कानने ३ आणि प्राचीने २ गोल करू न संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीच्या प्राक्षीने अतिशय सुंदर खेळप्रदर्शन करीत २ गोल करण्यात यश मिळविले. गोवाने दिल्लीला ५-२ ने पराभूत केले. मुलींच्या गटात तेलंगणा संघाने तृतीयस्थान मिळविले. मुलांच्या गटातील अंतिम सामनासुद्धा गोवा व दिल्ली संघात झाला. गोव्याचा चपळ खेळाडू इब्राहिम शेख व उल्पत यांनी आक्रमक खेळप्रदर्शन करीत प्रत्येकी ४ गोल केले. शिवाजी नाईकने ३ आणि बाबूराव याने संधीचे सोने करीत १ गोल केला. दिल्लीचा कर्णधार इंद्रप्रीतसिंह याने ३ आणि रणजित याने १ गोल केला. मात्र, गोवाच्या आक्रमक खेळीसमोर दिल्लीची ताकद चालली नाही. मुलांच्या गटात गुजरात संघाला तृतीयस्थानावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेत मुलांच्या गटात गोव्याची निकिता, तर मुलांमध्ये दिल्लीचा सूर्यकांत यांनी उत्कृष्ट गोलरक्षण केले. सवरेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार गोव्याचा इब्राहिम शेख आणि दिल्लीची प्राक्षी यांना मिळाला. प्रोत्साहन पुरस्कार राजस्थानची सुकना आणि महाराष्ट्राचा भूषण चंदनखेडे यांना मिळाला. शिस्तप्रिय संघाचा पुरस्कार मुलांमध्ये जम्मू-काश्मीर आणि मुलींमध्ये विदर्भ संघाला दिला.
आमदार गोपीकिसन बाजोरिया यांच्या हस्ते विजेता-उपविजेता संघांना विजयी ट्रॉफी देण्यात आल्या. याप्रसंगी माजी आमदार हरिदास भदे, अविनाश देशमुख, दीपाली गोळे, पंकज जायले, पंकज साबळे, युवराज पडोळे, फिरोज खान, रवी कल्ले, उमेश कल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार बाजोरिया यांनी आपल्या भाषणात, ‘ड्यूबॉल खेलेंगा इंडिया तो आगे बढेगा इंडिया’ म्हणत खेळाची प्रशंसा करू न, अकोल्यात आंतरराष्ट्रीय ड्यूबॉल स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला.