शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा अकोला राष्ट्रवादी काँग्रेस कडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2022 04:40 PM2022-04-09T16:40:22+5:302022-04-09T16:40:29+5:30

NCP News : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने मूक निषेध आंदोलन केले.

Akola NCP protests against attack on Sharad Pawar's house | शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा अकोला राष्ट्रवादी काँग्रेस कडून निषेध

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा अकोला राष्ट्रवादी काँग्रेस कडून निषेध

googlenewsNext

अकोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. या हल्ल्याचा शनिवारी अकोलाराष्ट्रवादी काँग्रेस कडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक गांधी जवाहर बागेमधील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने मूक निषेध आंदोलन केले.

     राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड, आ. अमोल मिटकरी, माजी आमदार हरिदास  भदे, प्रा. विश्वनाथ कांबळे, डॉ. आशा मिरगे, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील, राहूल डोंगरे, प्रा. विजय उजवने, राजकुमार मुलचंदाणी, यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी जवाहर बाग येथे करण्यात आलेल्या मूक निषेध आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

      महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे आदरणीय नेतृत्व असलेले खा. शरदचंद्र  पवार यांच्या घरावरील हल्ला ही अत्यंत निषेधार्ह घटना असून या घटनेने महाराष्ट्राच्या संस्कृती व परंपरेला धक्का पोहोचलेला आहे. अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत असे मत माजी मंत्री  गुलाबराव गावंडे यांनी व्यक्त केले.

  शरदचंद्र पवार  यांच्या मुंबईतील निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करून या हल्ल्यामागील खरा मास्टरमाईंड कोण आहे त्याचा शोध लवकरात लवकर घेऊन त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. या घटनेच्या निषेधार्थ आज मूक आंदोलन करण्यात आले भविष्यात अशी घटना घडली तर ती सहन केली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष  संग्राम गावंडे यांनी व्यक्त केली.

      या मूक निषेध आंदोलनामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, जयश्री ताई नवलकर, जिल्हा महासचिव आनंद वानखडे , विद्याताई अंभोरे,शिवाजीराव म्हैसने, राजू मंगळे, सुनिल अंधारे, अरुण काकड, गोपाळराव कडाले,युवराज गावंडे, दिनकरराव वाघ, माजी नगरसेवक पंकज गावंडे, प्रा धनराज खिराडे, किशोर हिंगणे, प्रा सदाशिव शेळके, रूपालीताई वाकोडे, डॉ. महेश लबडे, विशाल गावंडे, विनोद गावंडे, करण दोड, शिवाजीराव भरणे, बिस्मिल्ला खान, श्रीधर मोरे, संजय कोरडे, धर्मेंद्र शिरसाट, संजय मुळे, ॲड. बलदेव पळसपगार, शामराव वाहुरवाघ, बाबासाहेब घुमरे, राजू नीलखन,हर्षल ठाकरे, शैलेश बोदडे, सौ. विजया नवलकार, सुषमाताई कावरे, सुनिता ताथोड, सुनिता सावळे, अर्चनाताई थोरात, कल्पनाताई गव्हारगुरू, लक्ष्मीताई बोरकर, वृंदाताई भेंडे, वैशालीताई बाहाकर, सुषमाताई राठोड, वंदनाताई वाहने, सपना तेलगोटे, शोभाताई देवकते, सोनीताई कांबळे, राजू पाटील, अमोल शेंडे, अश्वजीत शिरसाट, गणेश घोगरे, विकी दांदळे, प्रणव तायडे, नितीन मानकर, अंकुश म्हेसने, प्रविण चतरकर, निलेश गुडदे, प्रकाश सोनोणे, रुपेश कांमले, प्रमोद बनसोड ,गजानन वानखडे सुगत तायडे ,सत्यमभाऊ, सागर मोहोड यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: Akola NCP protests against attack on Sharad Pawar's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.