नराधम सासऱ्याला १० वर्षांची शिक्षा; सून एकटी असल्याचे पाहून केलेला अतिप्रसंग

By नितिन गव्हाळे | Published: June 30, 2023 04:28 PM2023-06-30T16:28:08+5:302023-06-30T16:29:08+5:30

विनयभंग करणाऱ्या दिरासही दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा. आरोपी दिरास चांगले वागणुकीच्या हमी बाँडवर सोडले.

akola news Court sentenced father-in-law to 10 years; rape on seeing the daughter-in-law alone | नराधम सासऱ्याला १० वर्षांची शिक्षा; सून एकटी असल्याचे पाहून केलेला अतिप्रसंग

नराधम सासऱ्याला १० वर्षांची शिक्षा; सून एकटी असल्याचे पाहून केलेला अतिप्रसंग

googlenewsNext

नितीन गव्हाळे
अकोला : विद्यमान अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) एस. जे. शर्मा यांच्या न्यायालयाने मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गुन्ह्यात सुनेसोबत अतिप्रसंग करणाऱ्या सासऱ्यास शुक्रवारी १० वर्षांची शिक्षा व विनयभंग करणाऱ्या दिरास दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. 

या प्रकरणातील हकीगत अशी की, ६४ वर्षीय आरोपी सासऱ्याने त्याची सून घरी एकटी असताना तिचे सोबत अती प्रसंग केला व ही बाब कोणाला सांगितली तर जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपी २९ वर्षीय दिर हा त्याची वहिनी घरी एकटी असताना तिचा विनयभंग करीत असे. पीडिता माहेरी गेल्यावर तिने हा प्रकार तिच्या आईस सांगितला. त्यानंतर मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली. आरोपींवर सदर खटला चालवण्यात आला. या प्रकरणात सरकारतर्फे एकूण सहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्यात. 

सरकारतर्फे सहायक सरकारी वकील किरण खोत व ए.पी. गोटे यांनी बाजू मांडली. प्रकरणाचा तपास पीएसआय दीपक भगवान इंगळे यांनी केला. पैरवी म्हणून संतोष आंबीलवादे व प्रिया गजानन शेंगोकार यांनी सहकार्य केले.

साक्ष पुरावा ग्राह्य धरून आरोपीस खालील प्रमाणे शिक्षा ठोठावण्यात आली. आरोपी सासऱ्यास भादंवि कलम ३७६, ३७६ (दोन)(के) मध्ये १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास. कलम ५०६ मध्ये एक वर्ष सक्त मजुरी शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी दिरास कलम ३५४ मध्ये दोन वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास. कलम ३५४-ए मध्ये एक वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास. कलम ५०६ मध्ये एक वर्ष सक्त मजुरी शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली.  आरोपी दिरास चांगले वागणुकीच्या हमी बाँडवर सोडले.

Web Title: akola news Court sentenced father-in-law to 10 years; rape on seeing the daughter-in-law alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.