अकोला : आत्मदहनाच्या धास्तीने अधिकार्‍यांना आदेशाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:52 AM2018-02-13T01:52:56+5:302018-02-13T01:57:25+5:30

अकोला : सिद्धार्थ पूरपीडित मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्थेबाबतच्या तक्रारी, न्यायालयीन प्रकरणे, जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाने केलेल्या चौकशीत तक्रारकर्त्याच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतरही अफरातफरीची तक्रार करून कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा तक्रारकर्त्याने दिला.

Akola: Officers forgot orders of self-starvation | अकोला : आत्मदहनाच्या धास्तीने अधिकार्‍यांना आदेशाचा विसर

अकोला : आत्मदहनाच्या धास्तीने अधिकार्‍यांना आदेशाचा विसर

googlenewsNext
ठळक मुद्देसंधी न देता रेकॉर्ड ताब्यात घेतले तक्रारकर्त्याचा त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सिद्धार्थ पूरपीडित मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्थेबाबतच्या तक्रारी, न्यायालयीन प्रकरणे, जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाने केलेल्या चौकशीत तक्रारकर्त्याच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतरही अफरातफरीची तक्रार करून कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा तक्रारकर्त्याने दिला.  त्याची धास्ती घेत सहकार विभागाच्या अधिकार्‍यांनी आपल्याच आदेशाला अव्हेरून संस्थेचे रेकॉर्ड जप्तीची कारवाई केली. त्याचवेळी संस्थेला कोणताही पत्रव्यवहार न करता पोलिसांसह चुकीच्या पद्धतीने रेकॉर्ड जप्त करून नामुष्की केल्याने सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल न केल्यास कुटुंबासह १९ मार्च रोजीच्या जनता दरबारात आत्मदहन करण्याचा इशारा संस्थेचे सचिव शत्रुघ्न मुंडे यांनी पालकमंत्री डॉ. पाटील यांना निवेदनातून दिला.
सिद्धार्थ पूरपीडित मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेबाबत रवी घुमरे, राजकुमार सिरसाट यांनी तालुका उपनिबंधकांकडे तक्रारी केल्या. त्या निकाली काढण्यात आल्या. सहकार न्यायालय, उच्च न्यायालयात प्रकरणे दाखल केली. तेथेही संस्थेला दोषी ठरवण्यात आले नाही. तरीही तक्रारींचा सपाटा सुरू आहे. संस्थेचे १९७९ ते २0१७ पर्यंत अंकेक्षण झाले. त्यामध्ये दोषारोप नाही. 
तक्रारकर्त्यांनी उच्च न्यायालयातही प्रकरण दाखल केले. मात्र, तेथे टिकाव लागत नसल्याने मागे घेतले. त्यानंतर तक्रारीत पुणे सहकार आयुक्तांसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. त्यावर जिल्हा उपनिबंधक मावळे यांनी संस्थेचे चाचणी लेखा परीक्षण करण्याचा आदेश २0 जून २0१७ रोजी दिला. त्यानंतर दोन महिन्यांनी लेखापरीक्षक सरकटे यांनी पत्र दिले. संस्थेला भेट दिली नाही. त्यानंतर अधिकारी धार्मिक यांनी एकदा दुकानात भेट दिली. 
त्यावेळी संस्थेचे चाचणी लेखापरीक्षण करावयाचे आहे, एवढेच म्हटले. उपनिबंधकांच्या आदेशाला संस्था सचिवांनी डिसेंबर २0१७ मध्ये सहकार मंत्र्यांकडे आव्हान दिले. तक्रारी निकाली निघाल्यानंतरही तक्रारकर्त्याने पुणे आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाची धमकी दिली. त्यासाठी संस्थेची पातूर तालुका उपनिबंधकांकडून केलेल्या चौकशीत संस्थेवर कोणताही दोषारोप नाही. आता पुन्हा आत्मदहनाची धमकी दिल्याने संस्थेचे रेकॉर्ड चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतले. रवी घुमरे, बाबाराव घुमरे, मधुकर खडे, महेंद्र घुमरे, राजकुमार सिरसाट यांनी संस्थेच्या खुल्या भूखंडावर ताबा घेतला आहे. त्याबाबत तक्रार केली. मात्र, जुने शहर पोलिसांनी कारवाई केली नाही. त्याउलट  तहसीलदारांकडे चुकीचा आदेश, माहिती देऊन संस्थेचे रेकॉर्ड ताब्यात घेण्यात आले. यावेळी कुटुंबीयांना धमकावण्यात आले. सामानाची फेकाफेक केली. सहायक निरीक्षक सतीश पाटील, एस.वाय. सरकटे, दत्ता चव्हाण यांनी तक्रारकर्त्याला खूश करण्यासाठी हा प्रकार केला. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा मुंडे यांनी दिला.

Web Title: Akola: Officers forgot orders of self-starvation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.