अकोला : रेल्वे स्टेशन चौकात ट्रकने वृद्धेस चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 18:46 IST2021-03-02T18:46:24+5:302021-03-02T18:46:29+5:30
Accident News अपघातात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला असून, पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.

अकोला : रेल्वे स्टेशन चौकात ट्रकने वृद्धेस चिरडले
अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन चौकात एका भरधाव ट्रकने मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या एका वृद्ध महिलेस चिरडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या अपघातात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला असून, पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.
रेल्वे स्टेशन चौकात मानसिक स्वास्थ्य बिघडलेली एक वृद्ध महिला फिरत असतानाच शहरातून अकोट फाइलकडे जात असलेल्या यू पी ८७ टी ०१९१ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने महिलेस रेल्वे स्टेशन चौकात चिरडले. ट्रकखाली आल्याने महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला; मात्र पोलिसांनी तातडीने पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. महिलेस रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात रेल्वे स्टेशन चौकात यापूर्वी एका महाविद्यालयीन तरुणीला ट्रकने चिरडले होते. त्यानंतर आता पुन्हा त्याच ठिकाणी घटना घडल्याने रेल्वे स्टेशन चौकातील वाहतूक दुचाकी चालकांना धोकादायक असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.