Akola: कॉलेजला निघत होती, घरात शिरला अन् केला विनयभंग, आरोपी युवकास दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व दंड

By नितिन गव्हाळे | Published: August 19, 2023 07:08 PM2023-08-19T19:08:44+5:302023-08-19T19:10:04+5:30

Akola: पीडित युवती कॉलेजमध्ये जाण्याच्या तयारीत असताना, अचानक ३३ वर्षीय युवक घरात शिरला आणि युवतीचे तोंड दाबून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला.

Akola: On her way to college, entered the house and molested the accused youth, sentenced to two years hard labor and fined | Akola: कॉलेजला निघत होती, घरात शिरला अन् केला विनयभंग, आरोपी युवकास दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व दंड

Akola: कॉलेजला निघत होती, घरात शिरला अन् केला विनयभंग, आरोपी युवकास दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व दंड

googlenewsNext

- नितीन गव्हाळे
अकोला - पीडित युवती कॉलेजमध्ये जाण्याच्या तयारीत असताना, अचानक ३३ वर्षीय युवक घरात शिरला आणि युवतीचे तोंड दाबून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणात १९ ऑगस्ट रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकरयांनी आरोपी अमोल सुखलाल सुरवाडे(३३)रा. बटवाडी बु. ता. बाळापूर याला दोन वर्ष सक्तमजुरी शिक्षा व तीन हजार रूपये दंड ठोठावला आहे.

युवतीच्या तक्रारीनुसार १८ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ती कॉलेजला जाण्याची तयारी करून घराचे बाहेर निघत असताना आरोपीने तिच्या घरात शिरून तिचे तोंड दाबुन तिला लज्जा येईल असे वर्तन केले आणि तिचा विनयभंग केला. या प्रकरणात बाळापूर पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंवि कलम ४५२, ३५४(अ), ३२३ व कलम ८ पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पीएसआय पंकज काकडे यांनी केला होता. गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाने ९ साक्षीदार तपासले. साक्ष व पुरावे ग्राह्य मानुन न्यायालयाने आरोपी अमोल सुखलाल सुरवाडे याला दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व तीन हजार रूपये दंड, न भरल्यास अतिरिक्त तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील शितल दि. भुतडा यांनी बाजु मांडली. त्यांना महिला पोलिस शिपाई रेखा पाटीलयांनी सहकार्य केले.

Web Title: Akola: On her way to college, entered the house and molested the accused youth, sentenced to two years hard labor and fined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.