अकोला : महापौरांना काँग्रेसच्या मदतीचा विसर कसा? - विरोधी पक्षनेत्यांनी साधला निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 04:46 PM2018-02-08T16:46:13+5:302018-02-08T16:50:40+5:30
अकोला : करवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधकांमध्ये एकजूट असल्याचे दिसताच महापौर विजय अग्रवाल यांचे धाबे दणाणले आहे. कधीकाळी काँग्रेस, राकाँ व भारिपच्या सहकार्याने सत्तेची फळे चाखणाºया महापौरांना काँग्रेसच्या मदतीचा विसर पडल्याची टीका मनपातील विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी केली आहे.

सत्ताधारी भाजपाच्या मदतीने मनपा प्रशासनाने अकोलेकरांवर मोठ्या प्रमाणात करवाढ लादली आहे. करवाढ करताना प्रशासनाने सर्व नियम, निकष धाब्यावर बसवल्यामुळे सर्वप्रथम काँग्रेसच्यावतीने विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी दिलेल्या अहवालामुळे सत्ताधाºयांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापौर विजय अग्रवाल यांनी विरोधी पक्षांवर बिनबुडाचे आरोप केल्याचे विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी नमूद केले आहे. अक ोलेकरांच्या हितासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याचे पाहून महापौरांकडूनच अकोलेकरांना चूकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप साजीद खान यांनी केला आहे. विरोधकांनी मनपाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेतल्यानंतर सभागृहाची देखभाल करणाºया कर्मचाºयाला प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा प्रकार म्हणजे हुकूमशाहीचा प्रत्यय आल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी नमूद केले आहे.