हद्दवाढ प्रभागातील रस्त्याची दूरवस्था, पथदिवे पडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 06:46 PM2018-07-07T18:46:10+5:302018-07-07T19:11:53+5:30
अकोला : स्थानिक मलकापूर आणि खडकी परिसरातील न्यू महसूल कॉलनी, संंत नगर, साईनाथ नगर, संतोष नगर, जि.प. नगर, खडकी परिसरातील नागरी वसाहतीमधील रस्त्याची दूरावस्था झाली असून नगरसेवकांचे याकडे दुर्लक्ष आहे.
अकोला : स्थानिक मलकापूर आणि खडकी परिसरातील न्यू महसूल कॉलनी, संंत नगर, साईनाथ नगर, संतोष नगर, जि.प. नगर, खडकी परिसरातील नागरी वसाहतीमधील रस्त्याची दूरावस्था झाली असून नगरसेवकांचे याकडे दुर्लक्ष आहे. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील पाऊलवाटेवर चिखल माखले असून पादचार्यांचे आणि गाडी चालकांचे हाल होत आहे. परिसरात सर्वत्र गटार तुंबल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या गटारामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यापुर्वी परिसरातील नागरिक ग्राम पंचायतकडे तक्रार करीत असत, तेंव्हा परिसरातीस सरपंच,उपसरपंच, सदस्य लगेच धाऊन यायचे. परंतू महापालिकेच्या विस्तारात हा परिसर मनपा प्रभाग क्षेत्रात गेल्याने नगरसेक याकडे लक्ष देण्यास तयार नाहित. नगरसेवकांना फोन लावले तर कुणी प्रतिसाद देत नाही. नगरसेवक नागरिकांचे फोन उचलत नाहीत, कोणाचे ऐकत नाही. त्यामुळे नागरिक कमालिचे त्रस्त आहे. ग्राम पंचायतमध्ये असलेल्या खडकी परिसरात साफसफाईसाठी कुणी येत नाही. दरम्यान पावसाच्या पाण्याने नाल्या तुटूंब भरल्या आहेत. साफसफाई अजिबात नाही, रस्ते तर झालेलेच नाही, जे आहेत त्यांचीअवस्था वाईट आहे.परिसरात खांबावर लाईट बंद असून अंधाराचे साम्राज्य कायम पसरलेले असते, त्यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेप्रती प्रचंड रोष आहे.