आषाढी एकादशिनिमित्त विठुरायाच्या भक्तांसाठी अकोला-पंढरपूर विशेष रेल्वे मंगळवारी

By Atul.jaiswal | Published: July 10, 2024 02:34 PM2024-07-10T14:34:24+5:302024-07-10T14:34:40+5:30

विठ्ठलाच्या दर्शनासाठी यात्रेकरू प्रवासी मोठ्या संख्येने पंढरपूरकडे जाणार आहेत.

Akola Pandharpur Special Train on Tuesday | आषाढी एकादशिनिमित्त विठुरायाच्या भक्तांसाठी अकोला-पंढरपूर विशेष रेल्वे मंगळवारी

आषाढी एकादशिनिमित्त विठुरायाच्या भक्तांसाठी अकोला-पंढरपूर विशेष रेल्वे मंगळवारी

अकोला : आषाढी एकादशिनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांकरीता दक्षीण-मध्य रेल्वेने नांदेड विभागातून तीन विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये अकोला येथून मंगळवार, १६ जुलै रोजी विशेष एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे. यंदा आषाढ एकादशी १७ जुलै रोजी येत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी यात्रेकरू प्रवासी मोठ्या संख्येने पंढरपूरकडे जाणार आहेत. त्यानुसार, या यात्रेकरू प्रवाशांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातील नगरसोल, अकोला आणि आदिलाबाद येथून विशेष गाड्या चालवणार आहे.


दक्षीण-मध्य रेल्वेन जारी केलेल्या पत्रकानुसार, गाडी क्र. ०७५०५ अकोला-पंढरपूर विशेष मंगळवार, १६ जुलै रोजी अकोला स्थानकावरून सकाळी ११ वाजता रवाना होऊन बुधवार, १७ जुलै रोजी पंढरपूर स्थानकावर सकाळी १०:५० वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ०७५०६ पंढरपूर-अकोला विशेष बुधवार, १७ जुलै रोजी पंढरपूर स्थानकावरून रात्री २१:४० वाजता रवाना होऊन गुरुवार, १८ जुलै रोजी रात्री २०.०० वाजता अकोला स्थानकावर पोहोचणार आहे. या विशेष गाड्यांमध्ये १ वातानुकूलित, ४, स्लीपर क्लास आणि १७ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत.

या ठिकाणी असेल थांबा
विशेष गाडीला दोन्ही दिशेला वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जाहिराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चित्तपुर, वाडी, कलबुरगी, सोलापूर, कुरडूवाडी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

Web Title: Akola Pandharpur Special Train on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला