आम्ही अकोेलेकर सरसावले; शेकडो वृक्षांची लागवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 03:00 PM2019-07-10T15:00:12+5:302019-07-10T15:00:19+5:30

मोहिमेला अकोलेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाची चळवळ उभी होत आहे.

Akola; Planting of hundreds of trees! | आम्ही अकोेलेकर सरसावले; शेकडो वृक्षांची लागवड!

आम्ही अकोेलेकर सरसावले; शेकडो वृक्षांची लागवड!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील विविध संस्था व वृक्षप्रेमी नागरिकांनी एकत्रित येत आम्ही अकोेलेकरच्या पुढाकाराने शहरातील ठिकठिकाणी शेकडो वृक्षांची लागवड करून अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेला अकोलेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाची चळवळ उभी होत आहे.
अकोल्यातील सर्व निसर्ग संवर्धन करण्याकरिता कार्यरत संस्था, त्यातील समाविष्ट सर्व निसर्गप्रेमींनी वृक्षारोपणाच्या भव्य मोहिमेत अकोलेकर एकत्र येऊन शहरातील विविध भागात वृक्षारोपण केले आहे. यामध्ये आयटीआय कॉलेज, वैद्यकीय निवासस्थाने परिसर, नेहरू पार्कसमोर, गणेशकृपा मंगल कार्यालय, तुकाराम चौक, बिसेन यांचा ओपन स्पेस माधव नगर, हनुमान मंदिर, निवारा कॉलनी, संतोष नगरमधील शिव हनुमान मंदिर, संत नगर, खडकी, टीटीएन कॉलेजजवळ, केशव नगरमधील काळणे यांच्या घरासमोर, दुर्गादेवी मंदिराजवळ, जुने खेतान नगर, गणपती मंदिर, कौलखेड स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करण्यात आम्ही अकोलेकरांनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)


या संस्थांचा मोहिमेमध्ये सहभाग!
अकोल्यातील गायत्री परिवार, प्रभाग क्रमांक २० मधील महिला मंडळ, निसर्ग वैभव संस्था, आय. एम. अकोला व शुभम करोती फाउंडेशन, रोटरी क्लब आॅफ अकोला अ‍ॅग्रोसिटी, आस्था योग फाउंडेशन, अकोला ग्रीन क्लब आर्मी, मोरेश्वर फाउंडेशन, केशननगरवासी, जय बाभळेश्वर सामाजिक प्रतिष्ठान, डाबकी रोड, हॉकी अकोला असोसिएशन, पहाट बहूउद्देशीय संस्था व विनोद मापारी मित्र मंडळ आदी १३ संस्थांचा सहभाग आहे.

Web Title: Akola; Planting of hundreds of trees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.