Akola: दिवाळीतील ‘आनंदाचा शिधा’ वाटपाला ‘पोह्या’ची वाट!

By संतोष येलकर | Published: October 28, 2023 07:40 PM2023-10-28T19:40:21+5:302023-10-28T19:41:03+5:30

Akola News: दिवाळीसाठी पात्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रास्तभाव धान्य दुकानांमधून १०० रुपयांत एक किलो साखर, एक लिटर पामतेल आणि अर्धा किलो रवा, पोहे, मैदा व चनाडाळ इत्यादी शिधाजिन्नसांच्या ‘आनंदाचा शिधा’चे वाटप करण्यात येणार आहे.

Akola: 'Pohya' waits for distribution of 'Anandcha Shidha' in Diwali! | Akola: दिवाळीतील ‘आनंदाचा शिधा’ वाटपाला ‘पोह्या’ची वाट!

Akola: दिवाळीतील ‘आनंदाचा शिधा’ वाटपाला ‘पोह्या’ची वाट!

- संतोष येलकर
अकोला - दिवाळीसाठी पात्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रास्तभाव धान्य दुकानांमधून १०० रुपयांत एक किलो साखर, एक लिटर पामतेल आणि अर्धा किलो रवा, पोहे, मैदा व चनाडाळ इत्यादी शिधाजिन्नसांच्या ‘आनंदाचा शिधा’चे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात संबंधित काही शिधाजिन्नसांचा पुरवठा झाला असला तरी, पोह्यांचा अत्यल्प साठा उपलब्ध झाला आहे. शिधाजिन्नसांचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतरच ‘आनंदाचा शिधा’चे वितरण सुरू असून, त्यासाठी जिल्ह्यात पुरेसा ‘पोहे’साठा उपलब्ध होण्याची वाट आहे.

शासनाकडून जाहीर करण्यात आल्यानुसार येत्या दिवाळी सणासाठी अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब आणि एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’चे वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये पोहे आणि मैदादेखील दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हयातील पात्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आनंदाचा शिधाचे वाटप करण्यासाठी लागणाऱ्या संबंधित शिधाजिन्नसांची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. त्यानुसार मागणीच्या तुलनेत २७ ऑक्टोबरपर्यंत जिल्हयात काही शिधाजिन्नसांचा साठा प्राप्त झाला; मात्र त्यामध्ये पोहे साठा अत्यल्प उपलब्ध झाला आहे. शिधाजिन्नसांचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यात आनंदाचा शिधाचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात पोह्याचा पुरेसा साठा केव्हा उपलब्ध होणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.

२७ सप्टेंबरपर्यंत असा उपलब्ध
झाला शिधाजिन्नसांचा साठा !
रवा ३ लाख ३३ हजार ९०४ किलो
साखर १ लाख ७१ हजार ८६९ किलो.
चनाडाळ ९३ हजार ०५३ किलो.
पामतेल १ लाख ८५ हजार ८०२ लीटर
मैदा १ लाख ९५ हजार ०१४ किलो.

केवळ ३७ हजार किलो पोहे साठा उपलब्ध !
दिवाळीसाठी जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकारधारक कुटुंबांना आनंदाचा शिधामध्ये वाटप करण्यासाठी २७ ऑक्टोबरपर्यंत केवळ ३७ हजार ६२० किलो पोहे साठा उपलब्ध झाला आहे.

३.३१ लाख कुटुंबांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’
दिवाळीसाठी जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब आणि एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक ३ लाख ३१ हजार ५५१ कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’चे वाटप रास्तभाव धान्य दुकानांमधून करण्यात येणार आहे. शिधाजिन्नसांचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतर हे वाटप सुरू होणार आहे.

Web Title: Akola: 'Pohya' waits for distribution of 'Anandcha Shidha' in Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.