घरच्या मैदानावर अकोला पोलिसांचा ६-४ ने पराभव
By Admin | Published: June 8, 2015 01:28 AM2015-06-08T01:28:56+5:302015-06-08T01:28:56+5:30
संतश्री गजानन महाराज चषक हॉकी स्पर्धेत यंगस्टार अमरावती विजेता.
अँड. नीलिमा शिंगणे / अकोला : घरच्या मैदानावर अकोला पोलीस संघाला यंग स्टार अमरावती संघाकडून ६-४ ने पराभव स्वीकारावा लागला. संतश्री गजानन महाराज चषक हॉकी स्पर्धेतील अंतिम सामना अकोला पोलीस मुख्यालय हॉकी मैदानावर रविवारी झाला. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्याचा निकाल अखेर टायब्रेकरमध्ये घेण्यात आला. अमरावती संघ सुरुवातीपासूनच आपसी ताळमेळ राखून खेळत होता. सामन्याच्या १८ व्या मिनिटाला अमरावतीच्या जावेद खान याने पेनॉल्टी कॉर्नरद्वारा गोल करू न संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी दुसर्या मध्यंतरापर्यंत होती. सामन्याच्या ३९ व्या मिनिटाला अकोल्याचा नवोदित खेळाडू अभिनंदन ठाकूर याने गोल करू न सामना बरोबरीत आणला. सामन्याच्या निर्धारित वेळेपर्यंत सामना १-१ ने बरोबरीत होता. अकोला संघाचा खेळ मध्यंतरात अतिशय संथ झाला. आपसी ताळमेळ नसल्याने लय चुकत होती. मैदानावरच एकमेकांची उणेदुणे काढण्यात अकोला संघाने वेळ घालविला. मात्र, शेवटच्या १५ मिनिटाला वेगवान खेळ केला होता. परंतु, त्याचा फारसा फायदा संघाला झाला नाही. अनेक चांगल्या संधी मिळाल्या. मात्र, सर्व निष्फळ ठरल्या. टायब्रेकरमध्ये अमरावती संघाच्या इर्शाद मिर्झाने पहिला गोल करू न संघाला परत आघाडी मिळवून दिली. अकोल्याची पहिली संधी वाया गेली. अमरावतीच्या शोएब खान याने गोल केला. यानंतर अकोल्याचा स्टार खेळाडू विजय झटाले याने गोल करू न स्थिती परत १-१ बरोबरीत आणली. अमरावतीच्या खालीद अहमदने संधीचे सोने केले. यानंतर अकोल्याचा अभिषेक पाठक याने गोल केल्याने पुन्हा स्थिती २-२ ने समान झाली. अमरावतीच्या वसीम सोहेल याने गोल करू न आघाडी मिळविली. या गोलची परतफेड अकोल्याच्या धीरज चव्हाणने करू न परत स्थिती ३-३ ने समान झाली. यामुळे प्रेक्षकांमध्ये विजेता कोण होते, याबाबत अधिकच उत्कंठा वाढली. अमरावतीच्या रिजवान खान याने गोल करू न संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर मात्र, अकोल्याच्या खेळाडूला नशीबाची साथ न लाभल्याने, अखेर सामना अमरावती संघाने ६-४ ने जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. सामन्यात पंच म्हणून रफीउद्दीन, आसिफ शेख, राजकुमार झां यांनी काम पाहिले.