अकोला : ‘आरपीएफ’च्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 03:00 AM2017-12-13T03:00:35+5:302017-12-13T03:01:03+5:30

अकोला : मालगाडीच्या (लोको पायलट) चालकासोबत वाद घालून शासकीय कामात अडथळा आणणार्‍या ‘आरपीएफ’च्या दक्षिण मध्ये रेल्वेचे पोलीस निरीक्षक सुधीर कुमार यांच्याविरुध्द मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीआरपीचे ठाणेदार एस. डी. वानखडे यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली.

Akola: The police inspector of RPF filed the case against him | अकोला : ‘आरपीएफ’च्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला : ‘आरपीएफ’च्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देमालगाडी चालकाच्या तक्रारीवरून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मालगाडीच्या (लोको पायलट) चालकासोबत वाद घालून शासकीय कामात अडथळा आणणार्‍या ‘आरपीएफ’च्या दक्षिण मध्ये रेल्वेचे पोलीस निरीक्षक सुधीर कुमार यांच्याविरुध्द मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीआरपीचे ठाणेदार एस. डी. वानखडे यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली.
न्यू तापडिया नगरातील रहिवासी तसेच दक्षिण मध्य रेल्वेमध्ये कार्यरत असलेले मालगाडीचे चालक विजयकुमार सिंह रामलखन सिंह यांच्या तक्रारीनुसार ते सोमवारी रात्री १0 वाजून ३0 मिनिटांच्यादरम्यान मालगाडीवर कार्यरत होण्यासाठी जात होते. यावेळी आरपीएफचे पोलीस निरीक्षक सुधीर कुमार हे रेल्वेच्या बॉक्स बॉयसोबत वाद घालत असल्याचे मालगाडीचे चालक विजयकुमार सिंह रामलखन सिंह यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आरपीएफच्या पोलीस निरीक्षकांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस निरीक्षकाने मालगाडीचे चालक विजयकुमार सिंह रामलखन सिंह यांच्यासोबतच वाद घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या वादामुळे सदरची मालगाडी अर्धा तास उशिराने धावली.
 यासंदर्भात दक्षिण मध्ये रेल्वेचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

लोको पायलटच्या सर्मथनार्थ उतरले सर्व
मालगाडीचे लोकोपायलट विजयकुमार सिंह रामलखन सिंह यांच्यासोबत झालेल्या वादाची माहिती इतर लोक ो पायलट यांना मिळताच त्यांनी विजयकुमार सिंह यांच्या सर्मथनार्थ समोर येत जीआरपी पोलीस ठाणे गाठले; मात्र कारवाई झाल्यानंतर लोको पायलट कर्तव्यावर हजर झाले.
 
Web Title: Akola: The police inspector of RPF filed the case against him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.