अकोला पोलिसांनी मांडले बेपत्ता व्यक्तींच्या फोटोंचे प्रदर्शन
By admin | Published: July 8, 2017 02:40 PM2017-07-08T14:40:21+5:302017-07-08T15:12:49+5:30
गेल्या 10 वर्षांमध्ये बेपत्ता झालेले, हरवलेले आणि अनोळखी मृतदेहांच्या छायाचित्रांची प्रदर्शन पोलीस मुख्यालयातील दरबार सभागृहात शनिवारी मांडण्यात आले होते.
Next
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 8 - गेल्या 10 वर्षांमध्ये बेपत्ता झालेले, हरवलेले आणि अनोळखी मृतदेहांच्या छायाचित्रांची प्रदर्शन पोलीस मुख्यालयातील दरबार सभागृहात शनिवारी मांडण्यात आले होते. अकोला पोलिसांनी राबवलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
जिल्ह्यातून हरवलेल्या आणि सापडलेल्या व्यक्ती तसेच अनोळखी मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून हरवलेले, सापडलेले आणि अनोळखी मृतदेहांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पोलीस मुख्यालयातील दरबार सभागृहात 8 जुलै रोजी आयोजित करण्यात आले.
हरवलेले इसम, अनोळखी मृतक इसम यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आणि शोधपत्रिका प्रदर्शनाचे आयोजन ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सुरु करण्यात आले. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर आणि कैलास नागरे यांच्या उपस्थितीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनीला मोठा प्रतिसाद मिळत असून हरवलेल्या नातेवाईकांचा शोधण्यासाठी नागरिक छायाचित्र पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अनोळखी मृतदेहांची ओळख आणि हरवलेले नागरिकांच्या शोधासाठी ही छायाचित्र प्रदर्शनी मोठी मदतगार ठरणार असल्याचा विश्वास अकोला पोलिसांनी व्यक्त केला आहे.