राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत अकोला पोलीस संघ विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 01:49 PM2019-02-02T13:49:44+5:302019-02-02T13:49:50+5:30
अकोला: ३१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत अकोला पोलीस संघ हा विजेता ठरल्याने शुक्रवारी झालेल्या पोलीस मुख्यालयातील गुन्हे बैठकीत स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सत्कार केला.
अकोला: ३१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत अकोला पोलीस संघ हा विजेता ठरल्याने शुक्रवारी झालेल्या पोलीस मुख्यालयातील गुन्हे बैठकीत स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सत्कार केला.
अकोला पोलीस संघाने बास्केटबॉल, फुटबॉल, खो-खो, या खेळामध्ये प्रथम क्रमांक, हॉकी, कबड्डी, हॅण्डबॉल यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला तसेच अकोला महिला पोलीस यांनीही कबड्डी व खो-खो या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. अकोला पोलीस टीमचे प्रतिनिधित्व करणारे राखीव पोलीस निरीक्षक विकास तिडके व कोच सलीम खान यांचाही विशेष कामगिरीमुळे सत्कार करण्यात आला. पोलीस कर्मचारी फराज शेख यांना बेस्ट प्लेयर आॅफ द इयर, पोका रियाज अहेमद फुटबाल बेस्ट प्लेयर, अब्दुल फईम, मोईन खान यांनी फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करून प्रथम क्रमांक पटकावला. अरक सागर देशमुख यांनी धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून बेस्ट अॅथलेटिक्स प्लेयर म्हणून पुरस्कार पटकावला. पोकाँ. इम्रान शहा यांनी १00 मीटर उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ज्ञानेश्वर गीते याने १५00 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक, पोकाँ. मनोज अंभोरे यांनी बॉक्सिंगमध्ये प्रथम क्रमांक, इरफान खान यांनी वेट लिफ्टिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. महिला खेळाडू पूजा भटकर यांनी धावण्याच्या स्पर्धेत, तृष्णा घुमन यांनी बॉक्सिंगमध्ये शुभांगी खंडारे यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. त्यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख गौरव भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने, सुनील सोनवणे, नीलेश देशमुख यांच्यासह ठाणेदार उपस्थित होते.