अकोला : कार चोरीचे पाँडेचेरी कनेक्शन; कार खरेदी करणार्‍यास १४ दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 10:40 PM2017-12-19T22:40:24+5:302017-12-19T22:52:56+5:30

अकोला : शहराच्या विविध भागातून कार चोरी झाल्यानंतर त्या खरेदी-विक्रीच्या व्यवहार करणार्‍या एकास स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. या कार खरेदी करणार्‍यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Akola: Pondicherry connection of car theft; 14 day custody of a car buyer | अकोला : कार चोरीचे पाँडेचेरी कनेक्शन; कार खरेदी करणार्‍यास १४ दिवसांची कोठडी

अकोला : कार चोरीचे पाँडेचेरी कनेक्शन; कार खरेदी करणार्‍यास १४ दिवसांची कोठडी

Next
ठळक मुद्देशहराच्या विविध भागातून कार चोरीसात तवेरा वाहनांसह, इनोव्हा व आणखी काही कारचा समावेश चोरलेल्या वाहनांची विल्हेवाट पाँडेचेरीमध्ये 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहराच्या विविध भागातून कार चोरी झाल्यानंतर त्या खरेदी-विक्रीच्या व्यवहार करणार्‍या एकास स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. या कार खरेदी करणार्‍यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अकोला शहरातून मोठय़ा प्रमाणात कार चोरीला गेल्या आहेत. त्यात सात तवेरा वाहनांचा समावेश असून, इनोव्हा व आणखी काही कारचा समावेश आहे. या वाहनांचा तपास गत अनेक दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात सुरू असून, त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नागरे यांनी दोन पीएसआयसह १0 पोलिसांचे पथक गत १२ दिवसांपूर्वी पाँडेचेरीला पाठविले होते. पाँडेचेरी येथून पथकाने मुरगन ऊर्फ मशिलामनी एकाबरन नावाच्या इसमाला ताब्यात घेतले. अकोल्यातून कार चोरून नेऊन त्यांची विल्हेवाट पाँडेचेरीत लावण्याचे काम याच्या माध्यमातून होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर पोलीस त्यांना पाँडेचेरीला घेऊन जाणार आहेत. त्यानंतर काही कार सापडण्याची शक्यता आहे. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Web Title: Akola: Pondicherry connection of car theft; 14 day custody of a car buyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.