बार्शीटाकळी स्थानकावर तीन तास थांबली अकोला-पूर्णा पॅसेंजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 03:54 PM2018-08-25T15:54:58+5:302018-08-25T15:55:43+5:30
बार्शीटाकळी : इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अकोला-पूर्णा पॅसेंजर गाडी बार्शीटाकळी रेल्वे स्थानकावर २५ आॅगस्ट रोजी सकाळी तब्बल तीन तास थांबली.
बार्शीटाकळी : इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अकोला-पूर्णा पॅसेंजर गाडी बार्शीटाकळी रेल्वे स्थानकावर २५ आॅगस्ट रोजी सकाळी तब्बल तीन तास थांबली. त्यामुळे प्रवाशांचे हाल तर झालेच, शिवाय अकोल्याहून वाशिम येथे दररोज अप-डाउन करणारे कर्मचारी वेळेवर कार्यालयात पोहचू शकले नाहीत. दरम्यान, दुसऱ्या इंजिनची व्यवस्था करण्यात आल्यानंतर दहा वाजता ही गाडी रवाना झाली.
दक्षीण-मध्य रेल्वेच्याअकोला ते पूर्णा मार्गावर चालणारी ५७५८३ क्रमांकाच्या रेल्वेगाडी शनिवारी सकाळी ६.४५ वाजता बार्शीटाकळी स्थानकावर आली. या ठिकाणी इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे ही गाडी बार्शीटाकळी रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली. यासंदर्भात रेल्वेच्या अधिकाºयांना वर्दी देण्यात आली. इंजिन दुरुस्त होण्याची कोणतीही चिन्हे नसल्यामुळे अतिरिक्त इंजिनची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर सकाळी १० वाजताचे सुमारास ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. तब्बल तीन तास उशीर झाल्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.(तालुका प्रतिनिधी)