अकोला: जनता बाजारातील जुगार अड्डयावर छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:28 PM2018-05-15T18:28:48+5:302018-05-15T18:28:48+5:30

अकोला - जनता भाजी बाजारात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सिटी कोतवालीचे प्रभारी ठाणेदार तथा वाहतुक शाखा प्रमुख विलास पाटील यांनी मंगळवारी प्रभार स्विकारताच छापेमारी केली.

Akola: raid on the gambling | अकोला: जनता बाजारातील जुगार अड्डयावर छापेमारी

अकोला: जनता बाजारातील जुगार अड्डयावर छापेमारी

Next
ठळक मुद्दे१० जुगारींना अटक करण्यात आली. ८ मोबाईलसह रोख रक्कम असा एकून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.१० जुगारींविरुध्द सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अकोला - जनता भाजी बाजारात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सिटी कोतवालीचे प्रभारी ठाणेदार तथा वाहतुक शाखा प्रमुख विलास पाटील यांनी मंगळवारी प्रभार स्विकारताच छापेमारी केली. महेबुब खान व अंबु सुरेखा या दोघांनी हा जुगार अड्डा सुरु केला असून या जुगारावरुन १० जनांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जनता भाजी बाजारात मोठा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती वाहतुक शाखा प्रमूख तथा सिटी कोतवालीचे प्रभारी ठाणेदार विलास पाटील यांना मिळाली, त्यांनी कर्मचाऱ्यांसह या जुगारावर छापा टाकला. या ठिकाणावरुन गजानन गणपतराव काकड रा. बार्शिटाकळी, विनोद केशवराव गडवे रा. महाकाली नगर बाळापुर नाका, राजेश जगदीश पाठक रा. बाळापुर नाका, अजय कृष्णराव इचे रा. शिवाजी नगर जुने शहर, निलेश शंकर काकड रा. बायपास, बिस्मील्ला खा इनायत खा रा. चांदखा प्लॉट, सुभाष दामोदर चेकेटकर रा.रतनलाल प्लॉट, संजय चरणदास लहुकर रा.हरीहर पेठ, नाजुकराव वामनराव वानखडे रा. शिवापुर व माणिक ज्ञानदेव सरदार रा. पंचशील नगर वाशिम बायपास या १० जुगारींना अटक करण्यात आली. या जुगार अड्डयावरुन ८ मोबाईलसह रोख रक्कम असा एकून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महेबुब खान उर्फ मब्बा पहेलवान व अमीत उर्फ अंबु सुरेखा या दोघांचा हा जुगार अड्डा असल्याची माहिती समोर आली आहे. या १० जुगारींविरुध्द सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Akola: raid on the gambling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.