अकोला : जुने शहरातील जुगारावर छापेमारी; २ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 04:58 PM2020-06-16T16:58:03+5:302020-06-16T16:58:12+5:30

चार जुगारींना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रकमेसह २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Akola: Raids on gambling in the old city; 2 lakh worth of property confiscated | अकोला : जुने शहरातील जुगारावर छापेमारी; २ लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला : जुने शहरातील जुगारावर छापेमारी; २ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next

अकोला : जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाने डाबकी रोडवरील शिवाजी नगरमध्ये सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून चार जुगारींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रकमेसह २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील डाबकी रोडवरील शिवाजी नगरमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकासह शिवाजी नगर येथील जुगारावर छापा टाकला. या ठिकाणावरून नितीन अशोक मोहोड (३५) रा. शिवाजी नगर डाबकी रोड, सूरज किशोर सारवान (३०) रा. शिवाजी नगर डाबकी रोड, विनोद प्रकाश डिकाव (४०) रा. भीम नगर डाबकी रोड, सेवकराम सुखराम संकत (३५) रा. रा. शिवाजी नगर डाबकी रोड या चार जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडून रोख २० हजार रुपयांसह विविध कंपन्याचे एकूण ५ मोबाइल, मोटरसायकल व इतर साहित्य असा एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर सदर चार जणांविरुद्ध पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Akola: Raids on gambling in the old city; 2 lakh worth of property confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.