अकोला रेल्वे स्थानकावरील लिफ्ट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:57 PM2018-05-03T13:57:57+5:302018-05-03T13:59:37+5:30
अकोला : अकोला रेल्वे स्थानकावरील दोन्ही लिफ्टचे काम पूर्ण झाले असूून, अकोलेकर आता या लिफ्टच्या सेवेची प्रतीक्षा करीत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे बोलले जाते.
अकोला : अकोला रेल्वे स्थानकावरील दोन्ही लिफ्टचे काम पूर्ण झाले असूून, अकोलेकर आता या लिफ्टच्या सेवेची प्रतीक्षा करीत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे बोलले जाते.
अकोल्यातून प्रवास करणाऱ्यांना अधिक सुविधा मिळावी म्हणून अकोला रेल्वे स्थानकावर दोन लिफ्टचे बांधकाम करण्यात आले. रेल्वे स्थानकावरील पश्चिम दिशेकडील ओव्हर ब्रिजजवळ आणि प्लॅटफार्म क्रमांक दोनवर या लिफ्ट तयार असून, केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. दोन्ही लिफ्ट ३१ मार्चच्या आधी बांधण्यात याव्यात, असे निर्देश रेल्वे प्रशासनाने दिले होते. मात्र, या बांधकामाला चांगलाच उशीर झाला आहे. त्यामुळे दोन्ही लिफ्ट तयार असून, सेफ्टी सर्टिफिकेटअभावी त्या चालू शकत नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या प्रमाणपत्रासाठी अद्याप तरी कुणी पुढाकार घेतलेला नाही. अकोला रेल्वेस्थानकाचे अधीक्षक जी.बी. मीणा प्रशिक्षणासाठी असल्याने अकोला रेल्वे स्थानकावरील विकासाची सर्व कामे रेंगाळली आहेत. मध्य आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या डीआरएम यांनी अकोला रेल्वेस्थानकास भेट दिली. लवकरच या कामास गती मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, पंधरवडा होऊनही या कामाची गती अद्याप जैसे थे आहे. लोकप्रतिनिधींनी यात पुढाकरा घ्यावा, असा सूरही आता समोर येत आहे.