अकोला रेल्वेस्थानकावर आता फोर व्हीलर पार्किंगसाठी इन-आउट गेटची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 02:06 PM2018-11-24T14:06:56+5:302018-11-24T14:07:05+5:30
अकोला : रेल्वेस्थानकावर आता फोर व्हीलर पार्किंगसाठी इन-आउट गेटची सुविधा करण्यात येईल, अशी माहिती भुसावळ मध्य रेल्वे मंडळाचे व्यवस्थापक आर. के. यादव यांनी दिली.
अकोला : रेल्वेस्थानकावर आता फोर व्हीलर पार्किंगसाठी इन-आउट गेटची सुविधा करण्यात येईल, अशी माहिती भुसावळ मध्य रेल्वे मंडळाचे व्यवस्थापक आर. के. यादव यांनी दिली. अकोला परिसरातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी ते आले असताना त्यांनी ही सुविधा देण्याचे निर्देश दिले.
भुसावळ मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आगामी २२ डिसेंबर रोजी अकोल्यात आढावा घेण्यासाठी येत आहेत. मुंबईचे महाव्यवस्थापक यांचा अकोला दौरा असल्याने भुसावळ डीआरएम यादव यांचे दौरे वाढले आहेत. गुरुवारी रात्री शर्मा बडनेरा येथे मुक्कामी थांबले. दरम्यान, शुक्रवारी ११.४० वाजता ते अकोला रेल्वेस्थानकावर आले. स्थानकावरील साफसफाई, तिकीट घरांच्या सुविधा आणि पार्किंग व्यवस्थेची पाहणी त्यांनी यादरम्यान केली. फोर व्हीलर पार्किंगच्या अनेक समस्या असल्याच्या तक्रारी असल्याने यादव यांनी या पार्किंगला भेट देऊन इन-आउट गेटची सुविधा करण्याच्या सूचना आरपीएफ-जीआरपीला दिल्यात. दरम्यान, तातडीने या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. याप्रसंगी झेडआरयूसीसी सदस्य वसंत बाछुका, नितीन मल, निला, अकोला स्टेशन प्रबंधक ब्रजेश कुमार व राजेश दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते. अकोल्यातील रॅम्पच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ते शेगावकडे रवाना झाले.
- फोर व्हीलर पार्किंगचा मुद्दा अनेक वर्षांपासून रेंगाळत आहे. यादव यांच्या आधी दोन डीआरएम बदलून गेले; मात्र समस्या ‘जैसे थे’ राहिली आहे. यादव यांच्या निर्देशांचे पालन कितपत होते, याकडे लक्ष द्यावे लागेल.
-वसंत बाछुका, झेडआरयूसीसी, अकोला.
-फोर व्हीलर पार्किंगसाठी सोडलेल्या जागेवर टू व्हीलर आणि आॅटोरिक्षांची पार्किंग असते. पार्किंगची रक्कम घेऊनही रेल्वेस्थानकावर सुविधा मिळत नाही. येथे केवळ अधिकारी आले की शिस्त दिसते.
-ठाकूरदास चौधरी, जागरूक नागरिक, अकोला.