अकोला रेल्वे स्थानक वाय-फाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 02:27 AM2017-10-12T02:27:47+5:302017-10-12T02:28:00+5:30

अकोला : अकोला रेल्वेस्थानकावर बुधवारी वाय-फाय सेवा कार्यान्वित करण्यात आली. या सेवेचा लोकार्पण सोहळा खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. 

Akola Railway Station Wi-Fi! | अकोला रेल्वे स्थानक वाय-फाय!

अकोला रेल्वे स्थानक वाय-फाय!

googlenewsNext
ठळक मुद्देसत्तेपेक्षाही सेवा महत्त्वाची खासदार संजय धोत्रे

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला रेल्वेस्थानकावर बुधवारी वाय-फाय सेवा कार्यान्वित करण्यात आली. या सेवेचा लोकार्पण सोहळा खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. 
नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दीदिनी जनतेला सेवा सर्मपित करताना आनंद होत आहे. नानाजींनी सत्तेपेक्षा सेवेला महत्त्व दिले. त्यांच्या जन्मदिनी विकास आणि सेवेचा संगम घडून आला. ही सेवा प्रवाशांना लाभदायी ठरेल, असे प्रतिपादन खा. संजय धोत्रे यांनी येथे केले.
स्थानिक रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ वर  वाय-फाय सेवेचा छोटेखानी लोकार्पण सोहळा घेतला गेला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपाचे व्यापारी नेते वसंत बाछुका होते, तर प्रमुख अतिथी म्हणून महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, अँड. सुभाषसिंह ठाकूर, अशोक दालमिया, धनंजय गिरीधर, डॉ. विनोद बोर्डे, सुमनताई गावंडे, चंदाताई शर्मा, राजेंद्र गिरी, विजय परमार, उकंडराव सोनवणे उपस्थित होते. जनतेच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी भाजपा सरकार व लोकप्रतिनिधी कटिबद्ध  असून, रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही येथे खा. धोत्रे बोलले.  रेल्वे पुलासोबत अकोल्यातील प्रवाशांना अत्याधुनिक सुविधेसाठी लवकरच पुरेसा निधी प्राप्त होईल, अशी माहिती यावेळी खा. धोत्रे यांनी दिली. कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी व शेतमजूर यांच्या मृत्यूच्या घटना अत्यंत दुर्दैवी असून, लवकरच यवतमाळच्या धर्तीवर राज्य सरकारकडून मदत प्राप्त केली जाईल. यासाठी  आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर व आ. हरीश पिंपळे प्रयत्नशील असल्याचेही ते बोलले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगर अध्यक्ष किशोर पाटील यांनी केले, तर संचालन डॉ. विनोद बोर्डे व आभार धनंजय गिरीधर यांनी केले. यावेळी रेल्वे स्थानक अधीक्षक जी.बी. मीना, अभियंता राहुल उपर्वट, यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  अमल शिंदे, अम्मोल गोगे, नीलेश ठेवा, हेमंत शर्मा, दिलीप मिश्र, अनिताताई चौधरी, आरतीताई घोगलीया, रमेश परिहार, विजय दुबे, घनश्याम शिंदे, टोनी जयराज, लाल जोगी, बबलू पळसपगार, अजय शर्मा, अनुप गोसावी, अभिजित बांगर, अभिजित गोल्डे,  राजेश चौधरी, रोहित खोवाल, उज्ज्वल बामनेट, सुनील बाठे, धनंजय धबाले, प्रभाकर वानखेडे, जमील पटेल, इस्मैल चौधरी, सागर शेगोकार, अक्षय गंगाखेडकर, लोणकर, अनिल बुंदेले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Akola Railway Station Wi-Fi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.