अकोला रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 01:21 PM2019-01-15T13:21:03+5:302019-01-15T13:23:56+5:30
अकोला: रेल्वेस्थानकावर अकोला जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे व प्राचीन संस्कृतीच्या ओळखीचे छायाचित्र लावण्यात येत असून, एलईडी पथदिवे व अत्याधुनिक स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे.
अकोला: रेल्वेस्थानकावर अकोला जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे व प्राचीन संस्कृतीच्या ओळखीचे छायाचित्र लावण्यात येत असून, एलईडी पथदिवे व अत्याधुनिक स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे. प्रवाशांना सुविधेसाठी स्वच्छतागृह खा. संजय धोत्रे यांच्या हस्ते सोमवारी समर्पित करण्यात आले. तसेच खा. धोत्रे यांनी सुचविलेल्या अनेक उपाययोजना अनुसार मध्य रेल्वे व दक्षिण मध्य रेल्वे विभागातर्फे काम सुरू असून, त्याचा आढावा खा. धोत्रे यांनी घेतला. या वेळी वसंत बाछुका, सुभाषसिंग ठाकूर, राजेश मिश्रा, ज्ञानप्रकाश खंडेलवाल, दीपक मायी, भुसावळ विभागाचे एसीएम अरुणकुमार, एस.एम. भट्ट, टोनी जयराज, राजेश चौधरी, राजेंद्र गिरी, रमेश करिहार, राहुल देशमुख, सारिका जैस्वाल, प्रकाश रेड्डी, संतोष मोहता, सिद्धार्थ शर्मा, गिरीश जोशी, गजानन लोणकर, यामीन अन्सारी, डोंगरे, सुधीर मारवा आदी उपस्थित होते.