आंतरराष्ट्रीय युद्धकला स्पर्धेत अकोल्याला ४ पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 04:06 PM2019-11-29T16:06:43+5:302019-11-29T16:07:41+5:30
अकोला : दिल्लीमधील तालकोटरा स्टेडिअम येथे २२ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या आंतरराष्ट्रीय युद्धकला क्रीडा स्पर्धेत तायक्वांदो प्रकारात ...
अकोला : दिल्लीमधील तालकोटरा स्टेडिअम येथे २२ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या आंतरराष्ट्रीय युद्धकला क्रीडा स्पर्धेत तायक्वांदो प्रकारात अकोल्यातील खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत ५ पदकांची कमाई केली.
अकोल्यातील अखिलेश राजेश काळे, इशांत राजू इंगळे, हर्षा संतोष डिसले यांनी सुवर्णपदक पटकाविले. सम्यक गजानन इंगळे याने रौप्यपदक मिळविले. या स्पर्धेत भारतासह तुर्की, श्रीलंका, आॅस्ट्रेलिया, सौदी अरब, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ, थायलंड, रशिया आदी संघ सहभागी झाले होते. अक ोल्यातील खेळाडूंना प्रशिक्षक आरती कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंचे भारतीय संघटनाचे सचिव आर.के. भारत, कार्यकारी संचालक अनंत पाचकवडे यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे कौतुक केले.