दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला रनिंग रूमला मिळाले आयएसओ 9001: 2015 मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:57 PM2018-03-16T13:57:11+5:302018-03-16T13:57:11+5:30
अकोला : नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला रनिंग रूमला आयएसओ 9001: 2015 मानांकन मिळाले आहे. हा सन्मान अकोल्यास मिळाल्याने रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्यांचे कौतुक होत आहे.
अकोला : नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला रनिंग रूमला आयएसओ 9001: 2015 मानांकन मिळाले आहे. हा सन्मान अकोल्यास मिळाल्याने रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्यांचे कौतुक होत आहे. रेल्वे मार्गाने जाणाऱ्या लोको पायलट (ड्रायवर) आणि ट्रेन गार्डसाठी अकोला रेल्वे स्थानकावर रनिंग रूम निर्माण केली आहे. या रनिंग रूमची पाहणी मध्यंतरी करण्यात आली. अद्यावत सुविधा आणि व्यवस्थेसाठी अकोला रनिंग रूमला 9001: 2015 मानांकन देण्यात आले आहे.
लोको पायलटसाठी खान-पान , आराम, स्वच्छता, बाथरूम-टोयलेट नीट नेटके असणे गरजेचे असते. या सुविधेसोबत ध्यान केंद्र (मेडीटेशन रूम) तयार केले आहे. कर्मचार्यांच्या सुरक्षेबाबत घेण्यात आलेली काळजी लक्षात घेता, हे मानांकन केले जाते. एल.एस.एम. सर्टीफिकेशन प्रायवेट लिमिटेड, लखनौ या संस्थेतर्फे अकोला रनिंग रूमची पाहणी झाली होती. १५ मार्च रोजी श्री.बी. विश्वनाथ इर्या , उप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी अकोला रनिंगरूमचे निरीक्षण करीत सन्मानाने हे प्रमाणपत्र बहाल केले. यावेळी के.के.बी. गुप्ता,राजेंद्र कुमार, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी, श्री बी.के. सज्जा, वरिष्ठ विभागीत्य यांत्रिकी इंजिनिअर प्रामुख्याने उपस्थित होते. इर्या यांनी रनिंग रूमच्या कर्मचार्यांना प्रोस्ताहन म्हणून रोख बक्षीस देत त्यांचा गौरव केला. बी. विश्वनाथ इर्या, अप्पर विभागीय रेल्व व्यवस्थापक, नांदेड यांनी, यशवंतपूर ते अकोला या दरम्यान फुट प्लेटचे निरीक्षणही केले. यात पूर्णां ते अकोला दरम्यान येणारे सर्व सिग्नल आणि रेल्वे मार्गाच्या सुरक्षीततेची पाहणी केली.