अकोल्याची विद्यार्थिनी आरोही खोडकुंभेला ‘गदिमा' पुरस्कार
By atul.jaiswal | Published: November 22, 2017 05:25 PM2017-11-22T17:25:48+5:302017-11-22T17:27:42+5:30
अकोला : अकोल्याच्या बालशिवाजीची विद्यार्थिनी आरोही रामदास खोडकुंभे हिला 'गदिमा' प्रतिष्ठानातर्फे 'गदिमा' हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
अकोला : शालांत परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळ्वणाº्या विद्यार्थ्याला दरवर्षी 'गदिमा' प्रतिष्ठानातर्फे 'गदिमा' पुरस्कार दिल्या जातो. यंदा अकोल्याच्या बालशिवाजीची विद्यार्थिनी आरोही रामदास खोडकुंभे हिला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे येथे ग. दि. माडगूळकर यांचा स्मृती दिनानिमित्य आयोजित सोहळ्यात १४ डिसेंबर २०१७ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यात आरोहीला रोख रक्कम व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
हा गदिमा पुरस्कार मिळवण्याचा मान बालशिवाजी शाळेला दुसºयांदा मिळत आहे. मातृभाषेचा आग्रह धरणाºया बाल शिवाजी शाळेच्या यशात दुसºयांदा हा मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. यापूर्वी २०१५ च्या शालान्त परीक्षेत बाल शिवाजीच्या यशपाल मंगलसिंग पाकळ याने हा पुरस्कार प्राप्त केला होता. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आरोहीचे व मार्गदर्शक शिक्षिका मंजिरी कुळकर्णी यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव गद्रे, कार्यकारिणी सदस्या अनघा देव, शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा अग्रवाल, कीर्ती चोपडे, संगीता जळमकर व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.