Akola: अकोल्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 21:48 IST2023-11-03T21:36:48+5:302023-11-03T21:48:17+5:30
Govardhan Sharma Passed Away: सामान्य अकोलेकरांचा हक्काचा माणूस अशी ओळख असलेले माजी राज्यमंत्री तथा विधानसभेत सहा वेळा अकोल्याचे प्रतिनिधित्व केलेले आमदार गोवर्धन शर्मा यांचे आज निधन झाले.

Akola: अकोल्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन
अकोला - सामान्य अकोलेकरांचा हक्काचा माणूस अशी ओळख असलेले माजी राज्यमंत्री तथा विधानसभेत सहा वेळा अकोल्याचे प्रतिनिधित्व केलेले आमदार गोवर्धन शर्मा यांचे आज निधन झाले.
सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत असलेले गोवर्धन शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले एकनिष्ठ नेते होत. पश्चिम विदर्भात भारतीय जनता पक्षाला वाढवणारे व दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, भाऊसाहेब फुंडकर यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. पूर असो की दंगा, नैसर्गिक आपत्तीत मदतीला धावणारे व श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून सातत्याने मदतीचा हात देणारे ते नेते होते. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. उद्या अन्नपूर्णा माता मंदिराजवळ त्यांचे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी गंगा देवी शर्मा, दोन पुत्र, एक मुलगी असा मोठा परिवार आहे