राज्य ज्युनिअर-सिनिअर बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडापीठाला विजेतेपद
By Admin | Published: December 8, 2014 11:34 PM2014-12-08T23:34:33+5:302014-12-08T23:34:33+5:30
क्रीडापीठ संघाने पटकविले ६ सुवर्ण, १ रौप्य व ३ कांस्यपदके.
अकोला: चंद्रपूर येथे झालेल्या २९ व्या ज्युनिअर बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मुलांच्या गटात अकोला क्रीडाप्रबोधिनी संघाने सांघिक विजेतेपद पटकाविले. क्रीडापीठ संघाने स्पर्धेत ६ सुवर्ण, १ रौप्य व ३ कांस्यपदक पटकाविले. जिब्रान खान याने बेस्ट बॉक्सरचा पुरस्कार मिळविला. विक्की जांगळे, अनंता चोपडे, जिब्रान खान, सचिन चव्हाण, राहिल सिध्दीकी, करण कळमकर यांनी सुवर्णपदक पटकाविले. ऋषिकेश वानखडे याने रौप्यपदक मिळविले. हरिवंश टावरी, संग्राम भोसले, शुभम चौधरी यांना कांस्यपदक मिळाले. राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट, प्रशिक्षक राहुल वानखडे यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले.
*वरिष्ठ गटातदेखील क्रीडा प्रबोधिनी ठरली अव्वल
वरिष्ठ गटातदेखील अकोला क्रीडाप्रबोधिनीचा राज्यात दबदबा राहिला. ३ सुवर्ण व ३ रौप्यपदकांसह सामूहिक अजिंक्यपद संघाने पटकाविले. आदित्य मने, शिवाजी मोरे, सुनील उमरिया यांनी सुवर्णपदक पटकाविले. योगेश निषाद, विक्रमसिंह चंदेल, जयसिंग घुमन यांनी रौप्यपदक मिळविले. आगामी राष्ट्रीय स्पर्धेत अकोलाचे पदक विजेते बॉक्सर नक्कीच उत्तम कामगिरी करणार, असा विश्वास मार्गदर्शक भट्ट यांनी व्यक्त केला.