अकोला : अकोट येथील सट्टाकींग नरेश भुतडा सह चौघांच्या तडीपारीला स्थगीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 06:55 PM2018-01-13T18:55:20+5:302018-01-13T18:55:57+5:30
अकोला : अकोट येथील सट्टाकींग तथा डब्बा माफीया नरेश भुतडा सह चौघांच्या तडीपारीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने स्थगिती दिली आहे. पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या आदेशानंतर या चार जनांना दोन वर्षांसाठी जिल्हयातून तडीपार करण्यात आले होते, या चार जनांच्या तडीपारीला पुढील सुनावणी होईपर्यंत स्थगीती देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

अकोटमधील सट्टाकींग नरेश भुतडा, श्याम कडू, विरेंद्र रघुवंशी,आणि चेतन जोशी यां चार जनांना अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांनी अकोला जिल्हातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. या आदेशाचे विरोधात भुतडा सह चौघांनी नागूपर खंडपिठात याचिका दाखल केली होती.या याचिकेत सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती वासंती ए.नाईक आणि न्यायमूर्ती ए.डी. उपाध्ये यांनी तडीपारीच्या आदेशाला स्थगिती दिली. पोलीस अधिक्षकांसह इतर प्रतिवादिंना नोटिसेस बजावण्यात आल्या आहेत.दोन आठवड्यांचे आत जबाब दाखल करण्याचे त्यांना सांगण्यात आले.
तडीपारीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न
नरेश भुतडा व त्याच्या चार साथीदारानी चालविलेल्या सट्टा बाजारावर तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी छापा टाकून मोठा मुद्देमाल जप्त केला होता, त्यानंतर डब्बा ट्रेंडींगचा अवैध गौरखधंदयाचाही पर्दाफाश करण्यात आला होता, जिल्हयातीलच नव्हे तर देशपातळीवर अकोल्यातील सट्टा बाजार कुप्रसीध्द झाल्याने येथील आरोपींच्या तडीपारीसाठी तेव्हाच प्रयत्न करण्यात आले, पोलीस अधीक्षक कलासागर यांनी चारही आरोपींना तडीपार केले, मात्र या तडीपारीला राजकीय रंग देउन त्यांना वाचविण्यासाठी घाट घातल्या जात असल्याची चर्चा आहे.